शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या ट्रकवर भरधाव कंटेनर आदळला; चालकाचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 19:47 IST

अपघात एवढा भीषण होता की, कंटेनरचे हेड अक्षरश चक्काचूर झाले.

तुळजापूर - भरधाव वेगातील कंटेरने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून जाेराची धडक दिली. या भीषण अपघातात कंटेनरचालक जागीच ठार झाला. ही घटना उस्मानाबाद ते तुळजापूर या मार्गावरील बाेरी गावानजीक ३० नाेव्हेंबर राेजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. 

याबाबत अधिक माहिती अशी की,मयत चालक दिनेशकुमार वर्मा (वय २८, रा. गुरगाव-हरियाणा) येथून कंटेनरमध्ये (क्र.एचआर. ५५-व्ही. ७४१०) कुरिअर घेऊन सोलापूर मार्गे बेंगलोरकडे जात हाेते. भरधाव वेगातील हा कंटेनर मंगळवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर-साेलापूर मार्गावरील बाेरी गावानजीक आला असता, रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला (क्र. जीजे.१०-झेड.६६६५) पाठीमागून जाेराची धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, कंटेनरचे हेड अक्षरश चक्काचूर झाले. यात चालक दिनेशकुमार वर्मा व क्लिनर अनिलकुमार हे दोघेही  हेडमध्ये अडकून पडले हाेते. 

यातील क्लिनर कसाबसा सुखरूप बाहेर आला. तर चालकास बाहेर पडता आले नाही. ही घटना पाहून काही अंतरावर असलेल्या हाॅटेलमधील कामगार कंटेनरच्या दिशेने धावले. सर्वांनी मिळून चालक वर्मा यांना बाहेर काढून तातडीने उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात पाठविले. परंतु, रस्त्यातच त्यांची प्राणज्याेत मालवली. अपघाती घटनेची माहिती मिळताच बीट अंमलदार कमलकिशोर राऊत, पाेहेकाॅ. के. डी. चौधरी यांनी घटनास्थळास भेट देवून पंचानामा केला.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादDeathमृत्यूAccidentअपघात