हक्काचा विमा मिळवून घेऊच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:36 IST2021-09-27T04:36:10+5:302021-09-27T04:36:10+5:30
कळंब : मागील पाच दिवसांपासून तेरणा काठावर पावसाने हाहाकार उडवला आहे. या गावाचा आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी रविवारी पाहणी ...

हक्काचा विमा मिळवून घेऊच
कळंब : मागील पाच दिवसांपासून तेरणा काठावर पावसाने हाहाकार उडवला आहे. या गावाचा आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी रविवारी पाहणी दौरा करून ‘हताश होऊ नका, आपण आपल्या हक्काचा विमा मिळवून घेऊ’ असा धीर शेतकऱ्यांना दिला.
कळंब तालुक्यातील येरमाळा महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. येरमाळा, मोहा महसूल मंडळांतील तेरणा नदीच्या काठावरील गावासह बालाघाटाच्या माथ्यावरील गावात पावसाने विशेषतः सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याच पट्ट्यातील येरमाळा, वडगाव ज, सापनाई, चोराखळी, उपळाई आदी गावांना आ. पाटील यांनी भेट देऊन शेती पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकरी, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. आ. पाटील म्हणाले, नुकसान प्रचंड आहे. हताश होऊ नका. आपण आपल्या हक्काचा विमा मिळवूनच घेऊ. यासाठी ऑनलाइन क्लेम करावा. त्यासाठी अडचण येत असेल तर तलाठी, कृषी सहायक यांची भेट घ्यावी. पुरावा तयार करावा. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी सर्व ताकद पणाला लावणार असल्याचे सांगितले. यावेळी बाजार समितीचे सभापती रामहरी शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक विकास बारकुल, जि. प सदस्य मदन बारकुल, चोराखळीचे खंडेराव मैदाड, माजी उपसभापती भगवान ओव्हाळ, ॲड. विष्णू डोके आदी उपस्थित होते.