महिला दिनानिमित्त कायदेविषयक शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:29 IST2021-03-07T04:29:42+5:302021-03-07T04:29:42+5:30
उस्मानाबाद : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त येथील जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने तालुक्यातील पाडोळी (आ.) येथील रूपामाता माध्यमिक व उच्च ...

महिला दिनानिमित्त कायदेविषयक शिबीर
उस्मानाबाद : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त येथील जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने तालुक्यातील पाडोळी (आ.) येथील रूपामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत ६ मार्च रोजी कायदेविषयक शिबीर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश पी. बी. पोरे हे होते. याप्रसंगी जिल्हा विधि सेवा प्राधिकरण सचिव एस. बी. तोडकर, सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए. ए. शिंदे, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. सी. कलाल, विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. नितीन भोसले, ॲड. वैशाली धावणे, ॲड. ज्योती बेडेकर, ॲड. एम. बी. माढेकर, ॲड. व्ही. व्ही. गुंड, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, कर्मचारी तसेच जिल्हा विधि प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थित होते. शिबिरात मान्यवरांनी सुधारित मनोधैर्य योजना- २०१७ ची माहिती, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा - २००५ व हुंडा प्रतिबंध कायदा - १९६१ मधील तरतुदीविषयी मार्गदर्शन केले.