गुंजोटी येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST2021-06-22T04:22:24+5:302021-06-22T04:22:24+5:30

या वेळी जनसुविधा योजनेअंतर्गत गडावरील सिमेंट रस्ता, घंटागाडी, १४ व्या वित्त आयोगातून मुजावर गल्ली येथील पाणीपुरवठा, गुंडगा ते धनगर ...

Launch of various development works at Gunjoti | गुंजोटी येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

गुंजोटी येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

या वेळी जनसुविधा योजनेअंतर्गत गडावरील सिमेंट रस्ता, घंटागाडी, १४ व्या वित्त आयोगातून मुजावर गल्ली येथील पाणीपुरवठा, गुंडगा ते धनगर वस्ती पाणीपुरवठा पाइपलाइन, नागरी सुविधा योजनेअंतर्गत चौधरी प्लाॅट येथे सिमेंट रस्ता, तांडावस्ती सुधार योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता आदी कामांचा शुभारंभ आ. ज्ञानराज चौगुले, किरण गायकवाड व सभापती एम. ए. सुलतान यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे, गुंजोटीच्या सरपंच सरस्वतीताई कारे, उपसरपंच आयुब मुजावर, ग्रामपंचायत सदस्य योगेश शिंदे, रवींद्र देशमुख, श्रीनिवास हिरवे, सुरेश सूर्यवंशी, शेषेराव खंडागळे, इंद्रजीत म्हेत्रे, विजया चव्हाण, जयश्री कलशेट्टी, स्नेहा पाटील, कौशल्या बेळमकर, सोसायटीचे चेअरमन बलभीम शाईवाले, ओमप्रकाश शिंदे, प्रभाकरराव हिरवे, सुभाष पतंगे, खलील कुरेशी, आय.ए. काझी, खय्यूम मुजावर, किशन पाटील, अब्दुलाहक काजी, जगदीश सूर्यवंशी, नाईकवाडे, भगवान पुरी, सहदेव गायकवाड, प्रदीप शिवणेचारी, बंडू दूधभाते आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन विजय स्वामी यांनी केले तर आभार शाखाप्रमुख योगेश शिंदे यांनी मानले.

Web Title: Launch of various development works at Gunjoti