राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेस ‘तेरणा अभियांत्रिकी’त प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:06+5:302021-07-07T04:40:06+5:30
महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनियरिंग या विभागाने आयोजित केलेल्या या कार्यशाळेत सीएनसीवर ऑपरेशनल ट्रेनिंग, तसेच वेगवेगळे पार्ट कसे करायचे, यावर भर ...

राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेस ‘तेरणा अभियांत्रिकी’त प्रारंभ
महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनियरिंग या विभागाने आयोजित केलेल्या या कार्यशाळेत सीएनसीवर ऑपरेशनल ट्रेनिंग, तसेच वेगवेगळे पार्ट कसे करायचे, यावर भर देण्यात येणार आहे. आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलताना प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कोरोनामुळे विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल लर्निंग सुरू असून, ‘लायनेक्स एलएमएस’प्रणालीच्या माध्यमातून मुलांना परिपूर्ण प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न महाविद्यालयाने केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सध्या सुरू असलेल्या या ऑनलाइन कार्यशाळेद्वारे घरी असलेल्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन बरेच काही शिकता येईल आणि रोजगाराच्या संधीसुद्धा सहज उपलब्ध होतील. या कार्यशाळेत २५७ जण सहभागी झाले आहेत. मार्गदर्शक म्हणून जे. डी.बागूल, डी. जगताप, अनिकेत देशमुख, भिसे, तर समन्वयक म्हणून प्रा. एन. आर. कोडले, सहसमन्वयक प्रा. प्रशांत जैन, प्रा. उमेशचंद्र जाधव उपस्थित होते.