आर्थिक साक्षरता अभियानास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST2021-07-05T04:20:38+5:302021-07-05T04:20:38+5:30

(फोटो : सुशील शुक्ला ०३) परंडा: केंद्र शासन व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ...

Launch of Financial Literacy Campaign | आर्थिक साक्षरता अभियानास प्रारंभ

आर्थिक साक्षरता अभियानास प्रारंभ

(फोटो : सुशील शुक्ला ०३)

परंडा: केंद्र शासन व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ‘आर्थिक साक्षरता अभियान’ या मोहिमेस सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत कपिलापुरी येथे मास्टर ट्रेनर ए.व्ही. बारसकर, सहायक ट्रेनर एच.एम. अनभुले, गटसचिव जे.आर. गवारे, गटसचिव ए.बी. जानकर गटसचिव एन.एम. शिंदे यांनी केंद्र शासनाकडून शेतकऱ्यासाठी अंमलात आणलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजना, पीककर्ज त्वरित परत फेडीचे फायदे, प्रधानमंत्री फसल विमा योजना, अडचणीत सापडल्याने, शेतमालाची विक्री न करता, वेअर हाउस किंवा गोदामात ठेवणे, तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक नष्ट झाले, तर बँकेस कळविणे व मदत मिळविणे आदींबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. निवृृत्त शाखा तपासणीस एम.डी. पाटील यांनीही शेतकऱ्यांना मागर्दशन केले. याप्रसंगी कपिलापुरी शेतकरी सहकारी संस्थेचे अध्यक राजकुमार जैन, जयकुमार जैन, माजी सरपंच मोहन आवाने, सरपंच वैभव आवाने, पोलीस पाटील धर्मराज पाटील, युवा शेतकरी बचत गटाचे सचिव रणजीत पाटील, जयघोष आवाने, किशोर जैन, सचिन सावळे, सुकांत जैन, कुमार उपाध्ये, शिवाजी बोडरे व शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Launch of Financial Literacy Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.