शस्त्राचा धाक दाखवून वाहनातील साहित्य लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST2021-06-22T04:22:38+5:302021-06-22T04:22:38+5:30

एम. एच. १४/जे ए ७७९९ क्रमांकाचा कंटेनर हैदराबादहून किमती साहित्याचे पार्सल घेऊन नळदुर्गमार्गे मुंबईकडे जात होता. सोमवारी पहाटे दोन ...

Lampas the material in the vehicle out of fear of weapons | शस्त्राचा धाक दाखवून वाहनातील साहित्य लंपास

शस्त्राचा धाक दाखवून वाहनातील साहित्य लंपास

एम. एच. १४/जे ए ७७९९ क्रमांकाचा कंटेनर हैदराबादहून किमती साहित्याचे पार्सल घेऊन नळदुर्गमार्गे मुंबईकडे जात होता. सोमवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास महामार्गावरील फुलवाडी (ता. तुळजापूर) येथील टोलनाक्याच्या पुढे धनगरवाडी शिवारात अज्ञात चार चोरट्यांनी हातामध्ये टामी घेऊन गाडी अडवून चालकाला मारहाण सुरू केली. याच वेळी पाठीमागून आलेल्या अन्य वाहनचालकाने ईटकळ पोलीस चौकीत या घटनेची माहिती दिली. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत, सपोनि सुधीर मोटे, हेकॉ अतुल साळुंखे, लक्ष्मण शिंदे तत्काळ घटनास्थळी धावले. तत्पूर्वी विरोधी दिशेने येणाऱ्या पोलीस वाहनांची चाहूल लागताच चोरट्यांनी आंधाराचा फायदा घेत शेतातील उसामधून पलायन केले. घटनेचे गांभीर्य ओळखून तपासासाठी उस्मानाबाद येथील श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी वाहनचालक गुलफाम महेबूब शेख (रा. नजीर पिंपरी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २७ हजार रुपये साहित्य चोरीचा गुन्हा नळदुर्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Lampas the material in the vehicle out of fear of weapons