ढाेकी येथील विलगीकरण केंद्रास लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:34 IST2021-05-11T04:34:17+5:302021-05-11T04:34:17+5:30

ढाेकी : कळंब तालुक्यातील ढाेकी येथे सर्व पक्षीय व लाेकसहभागातून विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रासाठी कळंब-उस्मानाबादचे ...

Lakhs help to segregation center at Dhaeki | ढाेकी येथील विलगीकरण केंद्रास लाखाची मदत

ढाेकी येथील विलगीकरण केंद्रास लाखाची मदत

ढाेकी : कळंब तालुक्यातील ढाेकी येथे सर्व पक्षीय व लाेकसहभागातून विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रासाठी कळंब-उस्मानाबादचे आ. कैलास पाटील यांनी सुमारे १ लाखाची मदत दिली आहे.

ढोकीसह परिसरातील दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रुग्णांचे हे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ढोके येथील सर्वच राजकीय पक्ष व लाेकसहभागातून ढोकी येथील तेरणा प्रशालेत ५० खाटांचे कोरोना विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले. सध्या या विलगीकरण केंद्रामध्ये २० रुग्ण उपचार घेत आहेत.

पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख यांच्या प्रयत्नातून खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आ. कैलास पाटील यांनी या विलगीकरण कक्षाला एक लाख रुपयांची रोख स्वरूपात मदत केली. हे पैसे संग्राम देशमुख यांच्या हस्ते विलगीकरण कक्षाकडे सुपुर्द करण्यात आले.

यावेळी मंगेश तिवारी, पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख, समाज कल्याण विभागाचे माजी सभापती दगडू धावारे, मंगेश तिवारी, तानाजी माळी, संतोष कंदले, प्रमोद देशमुख, दत्ता साळुंखे, महेश तिवारी, संजय शिंदे, शहाजी कांबळे, एजास काझी, अतुल लोहार, शाकेर शेख, महादेव गाडवे आदींची उपस्थिती हाेती.

Web Title: Lakhs help to segregation center at Dhaeki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.