कोळी बांधवाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:00 IST2021-02-18T05:00:05+5:302021-02-18T05:00:05+5:30

उस्मानाबाद - कोळी समाजास महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी ५० वर्षापूर्वीच्या पुराव्याची अट न लावता सरसकट जातीचे दाखले ...

Koli brothers protest in front of Collector's office | कोळी बांधवाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

कोळी बांधवाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

उस्मानाबाद - कोळी समाजास महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी ५० वर्षापूर्वीच्या पुराव्याची अट न लावता सरसकट जातीचे दाखले देण्यात यावेत, या मागणीसाठी आदिवासी विकास संघ असोसीएशन महाराष्ट्र राज्य उस्मानाबाद‌ जिल्हा शाखेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, तुळजापूर तालुक्यातील नंदगाव व केशेगाव ही दोन गावे १९४८ च्या हैदराबाद स्वातंत्र्य लढ्यात रझाकारांनी केलेल्या हल्ल्यात संपूर्णपणे लुटून बेचिराख केली होती. त्यामुळे या गावातील व्यक्तींची घरे व ग्रामपंचायत हे शासकीय कार्यालय जळाल्यामुळे त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाने १ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना शपथ पत्र दिलेले आहे. तसेच याबाबत स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश महाराष्ट्र मराठवाडा या ग्रंथात देखील पुरावे उपलब्ध असल्याचे त्या शपथपत्रात नमूद केले आहे. शिवाय, उस्मानाबाद गॅझेटमध्ये पान नंबर १९४ वर देखील महादेव कोळी हे बालाघाटमध्ये राहतात, असा उल्लेख आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार ५० वर्षांपूर्वीचे पुरावे न मागता महादेव कोळी या जमातीचे दाखले निर्गमित करावेत असे आदेश ३१ मे २००० व १६ मे २००४ रोजीचे आहेत. त्यामुळे शासनाच्या परिपत्रकानुसार कोणतेही पुरावे न मागता कोळी बांधवास महादेव कोळी जातीचे दाखले देण्यात यावेत, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष रवीकिरण घंटे, उपाध्यक्ष उमाकांत घंटे, सचिव पंडित घंटे, कार्याध्यक्ष गंगाधर कोळी, गौरीशंकर कोळी, नागेंद्र जमादार, विजयकुमार घंटे, सारंग कोळी, सतीश कोळी, काशिनाथ कोळी, शंकर घंटे, रविराज कोळी, भालचंद्र कोळी, अमर कोळी, ऋतीक कोळी, शाम कोळी, रामदास खोत, गोकूळ कोळी, कार्तिक कोळी, खुशी कोळी, खंडू कोळी, दत्ता कोळी, युवराज कोळी, अनिल कोळी, धोंडू कोळी, रतिकांत कोळी, महेश कोळी व विष्णू कोळी आदी उपस्थित होते.

Web Title: Koli brothers protest in front of Collector's office