किसन पांचाळ यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:27 IST2021-01-17T04:27:51+5:302021-01-17T04:27:51+5:30
मेहताब शेख लोहारा : उमरगा तालुक्यातील काटेवाडी येथील मेहताब हुसेनी शेख (वय ९५) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ...

किसन पांचाळ यांचे निधन
मेहताब शेख
लोहारा : उमरगा तालुक्यातील काटेवाडी येथील मेहताब हुसेनी शेख (वय ९५) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. लोहारा येथल पत्रकार महेबूब फकीर व पाशुमियाँ मुल्ला यांचे ते आजोबा होत.
रामदास भूजबळ
लोहारा : तालुक्यातील वडगाव (गां) येथील सेवानिवृत्त पो कॉ रामदास शिवमूर्ती भुजबळ यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, एक बहीण, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. उपसरपंच लक्ष्मण भुजबळ यांचे ते मोठे बंधू होत.
शांताबाई मक्तेदार
लोहारा : शहरातील शांताबाई व्यंकटराव मक्तेदार (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.