शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

‘खंडेश्वरी’ तलाव पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर; गावे भयभीत असताना अधिकारी नॉट रिचेबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 12:18 IST

‘Khandeshwari’ lake on the threshold of break परंडा तालुक्यातील खंडेश्वर मध्यम प्रकल्पाच्या पाळूला काही दिवसांपूर्वीच ७० ते ८० फूट अंतराच्या भेगा पडल्या होत्या़

ठळक मुद्देपरंडा तालुक्यातील खंडेश्वरी तलाव पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर परतीच्या पावसामुळे पुन्हा पाण्याची आवक वाढून तलावाला धोका

उस्मानाबाद : ‘गाँव जले, हनुमान बाहर’ शी एक म्हण ग्रामीण भागात चांगलीच प्रचलित आहे़ अगदी त्याचाच प्रत्यय पाटबंधारेच्या अभियंत्यांनी नुकताच आणून दिला आहे़ परंडा तालुक्यातील खंडेश्वरी तलाव पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर असताना अधिकारी नॉट रिचेबल होते़ यामुळे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना तडक नोटिस काढून कारवाईचा इशारा दिला आहे़

परंडा तालुक्यातील खंडेश्वर मध्यम प्रकल्पाच्या पाळूला काही दिवसांपूर्वीच ७० ते ८० फूट अंतराच्या भेगा पडल्या होत्या़ त्यावेळी सांडवा फोडून पाणी सोडून देण्यात आले होते़ जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी २ आॅक्टोबर रोजी स्वत: भेट देऊन पाणी सोडण्याच्या व अहवाल सादर करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला केल्या होत्या़ यानंतर आता परतीच्या पावसामुळे पुन्हा पाण्याची आवक वाढून तलावाला धोका निर्माण झाला आहे़ पाऊस वाढू लागल्याने तलावाखालीत भागात राहणाऱ्या गावातील लोक भयभीत झाले आहेत़ अशावेळी आवश्यक कारवाई करण्याचे सोडून पाटबंधारे विभागाने परंडा तहसीलदारांना पत्र देत धोक्याचा इशारा गावकऱ्यांना देण्याबाबत कळविले़ 

यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी कार्यकारी अभियंता स़स़ आवटे तसेच उपविभागीय अभियंता एस़बी़ पाटील यांच्याकडून स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला़ मात्र, हे दोन्ही अधिकारी १० व ११ आॅक्टोबर या दोन दिवशी ‘नॉट रिचेबल’ होते़ एकिकडे तलावाच्या संदर्भाने धोक्याची स्थिती निर्माण झालेली असताना हे दोघेही बेफिकीर आढळून येत आहेत़ आपल्या जबाबदारीचे पालन न केल्यामुळे आपल्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाचे कलम ५१ व भारतीय दंड विधानाचे कलम १८८ अन्वये कारवाई का करु नये, अशी विचारणा करणारी नोटिस निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी जारी केली आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादUsmanabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबादWaterपाणी