वाशी ठाण्याची सूत्रे खनाळ यांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:39 IST2021-09-04T04:39:26+5:302021-09-04T04:39:26+5:30

वाशी ठाण्याचे नियमित पाेनि काशिद यांची बदली तुळजापूर येथे करण्यात आली हाेती. या ठिकाणी नियमित अधिकारी नियुक्त करण्यात आले ...

Khanal in charge of Vashi Thane | वाशी ठाण्याची सूत्रे खनाळ यांच्या हाती

वाशी ठाण्याची सूत्रे खनाळ यांच्या हाती

वाशी ठाण्याचे नियमित पाेनि काशिद यांची बदली तुळजापूर येथे करण्यात आली हाेती. या ठिकाणी नियमित अधिकारी नियुक्त करण्यात आले नव्हते. त्यामुळे ठाण्याचा कार्यभार सहायक पाेलीस निरीक्षक यांच्याकडे साेपविण्यात आला हाेता. या दाेन महिन्याच्या कालावधीत चाेऱ्यांचे प्रमाण वाढले हाेते. त्यामुळे नियमित अधिकारी नेमावेत, अशी मागणी नागरिकांतून हाेत हाेती. त्यानुसार रामेश्वर खनाळ यांच्या रूपाने ठाण्याला नियमित अधिकारी मिळाले आहेत. त्यांनी गुरुवारी पदाची सूत्रे हाती घेतली. दरम्यान, पाेउपनि संजीव निरगुडे हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर किशाेर काळे यांची नियुक्ती करण्यात आली. या दाेन्ही अधिकाऱ्यांचा विविध संघटना, संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी, तुळशीदास करडे, बाळासाहेब सुकाळे, रामकुंडचे माजी सरपंच सुरेश हाके, अमरसिंह तागडे, गौतम चेडे, नवनाथ टकले, नेताजी नलवडे, दादासाहेब लगाडे आदी उपस्थित हाेते. शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास माझे प्राधान्य राहील, अशी ग्वाही पाेनि खनाळ यांनी दिली.

Web Title: Khanal in charge of Vashi Thane