गीतरामायणात काटीकर मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:33 IST2021-02-16T04:33:23+5:302021-02-16T04:33:23+5:30

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील काटी येथे श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अभियानांतर्गत संस्कार भारतीच्या वतीने प्रसन्नकुमार कोंडो यांच्या गीतरामायण ...

Katikar is enchanted in Geetaramayana | गीतरामायणात काटीकर मंत्रमुग्ध

गीतरामायणात काटीकर मंत्रमुग्ध

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील काटी येथे श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अभियानांतर्गत संस्कार भारतीच्या वतीने प्रसन्नकुमार कोंडो यांच्या गीतरामायण कार्यक्रमाचे ११ वे पुष्प पार पडले.

प्रारंभी सरस्वती प्रतिमेचे पूजन सरपंच आदेश कोळी यांच्या हस्ते झाले. यावेळी उमाजी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सतीश देशमुख, व्यावसायिक विद्यासागर ढगे, अतुल सराफ, अविनाश वाडकर, सुहास सांळुके, जिल्हाप्रमुख शेषनाथ वाघ, अध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, ज्ञानेश्वर गुरव, अनिल बनसोडे, प्रकाश गावडे, काकासाहेब रोडे आदी उपस्थित होते. सादरकर्ते कोंडो यांनी कार्यक्रमाची सुरुवात ‘स्वयें श्री राम प्रभू ऐकती’ या गीताने कली. कोंडो यांना पेटीवादक प्रा. अशोक कुलकर्णी, तबलावादक अण्णा वडगावकर, टाळवादक सुरेश वाघमारे सुंभेकर, शेषनाथ वाघ, साथसंगत शरद वडगावकर, श्यामसुंदर भन्साळी, सुधीर पवार, नितीन भन्साळी यांनी चांगली साथ दिली. कार्यक्रमास प्रमोद कुलकर्णी धामणगावकर, उमाजी गायकवाड, अतुल सराफ, अविनाश वाडकर, काकासाहेब रोडे आदींसह भजनी मंडळ, ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Katikar is enchanted in Geetaramayana