‘ग्रामीण’मध्येही वाढताेय काेराेनाचा धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST2021-05-07T04:34:44+5:302021-05-07T04:34:44+5:30

मुरुम-ः शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड संशयित आणि संंपर्कातील नागरीकांची मंगळवार, बुधवार, गुरुवार या तीन दिवसांत करण्यात आलेल्या रँपिड ॲंटीजेन ...

Kareena's fervor is also growing in the 'rural' | ‘ग्रामीण’मध्येही वाढताेय काेराेनाचा धाेका

‘ग्रामीण’मध्येही वाढताेय काेराेनाचा धाेका

मुरुम-ः शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड संशयित आणि संंपर्कातील नागरीकांची मंगळवार, बुधवार, गुरुवार या तीन दिवसांत करण्यात आलेल्या रँपिड ॲंटीजेन चाचणीत मुरुम शहरात ११ तर उमरगा तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्यकेंद्राअंर्तगत व ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलेल्या चाचणीत ग्रामीण भागातील ४२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

मुरूम शहरातील कोविड सेंटरमध्ये उमरगा व लोहारा तालुक्यातील ६५ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत तर उपचारानंतर बरे झालेल्या १० जणांना मागील तीन दिवसांमध्ये डिस्चार्ज देण्यात आले आहे. दुसरीकडे कोरोनाला रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र लॉकडाऊनच्या काळातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरवासियांसह ग्रामीण भागातील नागरिकांची चिंता देखील वाढली आहे. शहरातील बाधितांची संख्या ११ ने वाढून १५९ झाली आहे.तर ग्रामीण भागात तीन दिवसांत तब्बल ४२ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. शहरातील ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी, बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या रॅपिड ॲंटीजेन चाचणीत शहरातील ११ तर ग्रामीण भागातील १३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर उमरगा तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावातील रॅपिड चाचणीत २९ जण बाधित असल्याचे आढळून आले. काेराेनाने आजवर शहरात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

चाैकट...

शहरातील ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी झालेल्या रॅपिड ॲंटीजेन चाचणीत शहरातील चार तर उमरगा तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्यकेंद्राअंर्तगत झालेल्या चाचणीत ग्रामीण भागात १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. शहरातील कोविड सेंटरमध्ये ६५ जणांवर उपचार सुरु असून पाच जणांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आले, अशी माहिती मुरुम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सत्यजीत डुकरे यांनी दिली.

Web Title: Kareena's fervor is also growing in the 'rural'