कळंब पालिकेला मिळाले नियमित ‘सीओ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:35 IST2021-05-06T04:35:11+5:302021-05-06T04:35:11+5:30

कळंब -कळंब नगर परिषदेला अखेर पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले आहेत. लातूर महानगर पालिकेच्या सहआयुक्त शैला डाके यांची कळंब पालिका मुख्याधिकारी ...

Kalamb Municipality gets regular 'CO' | कळंब पालिकेला मिळाले नियमित ‘सीओ’

कळंब पालिकेला मिळाले नियमित ‘सीओ’

कळंब -कळंब नगर परिषदेला अखेर पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले आहेत. लातूर महानगर पालिकेच्या सहआयुक्त शैला डाके यांची कळंब पालिका मुख्याधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्या कळंब नगर परिषदेच्या पहिल्या पूर्णवेळ महिला मुख्याधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

कळंब नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी देविदास जाधव यांची बढतीवर बदली झाल्यानंतर मागील जवळपास ३ महिन्यापासून कळंब पालिकेचा कारभार तुळजापूरचे अतिरिक्त मुख्याधिकारी आशीष लोकरे हे पाहत होते. कळंब शहराला पूर्णवेळ मुख्याधिकारी द्यावेत यासाठी पालिकेच्या सत्ताधारी मंडळींनीही शासनाकडे पाठपुरावा केला होता.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पालिकेचा प्रशासकीय कारभार योग्य पद्धतीने व्हावा यासाठी पूर्णवेळ मुख्याधिकारी असणे गरजेचे होते. नागरिकांतूनही याबाबत मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर लातूर महानगर पालिकेच्या सहआयुक्त शैला डाके यांची कळंब पालिका मुख्याधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

याबाबत शासनाच्या नगरविकास विभागाने ३ मे रोजी आदेश निर्गमित केले आहेत. या नियुक्तीमुळे पालिका प्रशासनाचा कारभार अधिक कार्यक्षमतेने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Kalamb Municipality gets regular 'CO'