जिजामाता शाळेत जागतिक महिला दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:31 IST2021-03-10T04:31:56+5:302021-03-10T04:31:56+5:30

परंडा : येथील जिजामाता शाळेत डॉ. रमा मोरे व संस्थेच्या संचालिका रोहिणीताई साळुंके यांच्या हस्ते माँ साहेब जिजाऊ ...

Jijamata School celebrates International Women's Day | जिजामाता शाळेत जागतिक महिला दिन साजरा

जिजामाता शाळेत जागतिक महिला दिन साजरा

परंडा : येथील जिजामाता शाळेत डॉ. रमा मोरे व संस्थेच्या संचालिका रोहिणीताई साळुंके यांच्या हस्ते माँ साहेब जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी समाजातील आदर्श व ज्येष्ठ महिला सुमन विष्णू कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. रमा मोरे यांनी कोरोनाच्या काळात आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याचे प्रात्यक्षिके करून दाखवले. तसेच आहाराविषयी माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक घाडगे व कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास संतोष पाटील, नितीन शिंदे, नितीन पाबळे, राजेंद्र जाधव, ज्योती दिवाने, शीला कांबळे, मंगल हिंगणकर, मोमीन तब्बसूम आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन तपस्या पाटील तर आभार प्रदर्शन ज्योती दिवाने यांनी केले.

Web Title: Jijamata School celebrates International Women's Day