उस्मानाबाद : घराच्या बांधकामावरील मिस्त्रीकडे विश्वासाने १६ ग्रॅमचे साेन्याचे गंठण बहिणीला देण्यासाठी दिले, परंतु हे दागिने हे दागिने बहिणीकडे पाेच न करता लांबविले. हा प्रकार समाेर आल्यानंतर संबंधित मिस्त्रीविरुद्ध १ मार्च राेजी आंबी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, परंडा तालुक्यातील आनाळा येथील मुकुंद संपत्ती रिटे यांच्या बांधकामावरील मिस्त्री धुळादेव निवृत्ती हाेनमाने (रा. भेंड, ता. माढा) हा ३० जानेवारी राेजी आपल्या गावी जात हाेता. मुकुंद रिटे यांची बहीणही त्याच्याच गावात आहेत. त्यामुळे रिटे यांनी माेठ्या विश्वासाने मिस्त्री हाेनमाने याच्याकडे १६ ग्रॅम साेन्याचे गंठन देऊन बहिणीकडे पाेच करण्यास सांगितले. यानंतर, काही दिवसांनी रिटे यांनी बहिणीस फाेनवरून गंठन मिळाले का, अशी विचारणा केली असता, तिने गंठन मिळाले नाही, असे सांगतले. यानंतर, रिटे यांनी मिस्त्री हाेनमाने यास फाेन केला असता, ताे बंद आला. या प्रकरणी रिटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १ मार्च राेजी आनाळा आंबी पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.