फुटबॉल स्पर्धेत जालनाच्या संघाने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:59 IST2021-02-06T04:59:43+5:302021-02-06T04:59:43+5:30

(फोटो - बालाजी आडसूळ ०४) कळंब : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त येथील सिटीजन फाऊंडेशन आणि मोहेकर ...

Jalna's team won the football tournament | फुटबॉल स्पर्धेत जालनाच्या संघाने मारली बाजी

फुटबॉल स्पर्धेत जालनाच्या संघाने मारली बाजी

(फोटो - बालाजी आडसूळ ०४)

कळंब : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त येथील सिटीजन फाऊंडेशन आणि मोहेकर महाविद्यालयात आयोजित खुल्या फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामना जालना आणि नेकनूरच्या संघात झाला. यामध्ये जालनाच्या संघाने २-० बाजी मारत विजेतेपद पटकाविले. तर नेकनूरचा संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघास १५ हजार ३९१ रुपये आणि सिटी कप देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

शिवजन्मोत्सवानिमित्त कळंबमध्ये पहिल्यांदाच १ ते ३ फेब्रुवारी दरम्यान खुल्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यातून रायगड, अहमदनगर, जालना, बीड, बार्शी, उस्मानाबाद येथील १६ संघांनी सहभाग नोंदविला होता. यात जालनाच्या संघाने बाजी मारून सिटी कप २०२१ वर आपले नाव कोरले. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम ११ हजार ३९१ रुपये नेकनूरने तर उस्मानाबादच्या संघाने ७ हजार ३८१ रुपयांचे तिसरे पारितोषिक पटकाविले.

मोहेकर महाविद्यालयाच्या क्रीडा संकुल मैदानावर तीन दिवस हे फुटबॉलचे सामने रंगले होते. तिसऱ्या दिवशी बुधवारी अंतिम सामना झाल्यावर मैदानावरच बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार, क्रीडा विभागप्रमुख डॉ. भारत गपाट, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तारेक मिर्झा, जलप्रतिष्ठानचे अजित काळे, अशोक चोंदे, संतोष घाटपरडे, संजीत मस्के, अरविंद शिंदे, डॉ. हनुमंत चौधरी या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. सुनील पवार यांनी सिटीजन फाऊंडेशनच्या नियोजनाचे कौतुक केले. सामन्यात पंच म्हणून भाऊसाहेब पाटील, अतुल मुंढे यांनी कामगिरी पार पाडली. स्पर्धेसाठी राजकुमार ढगे, कार्तिक इंगळे, अतुल मुंढे, आकाश कल्याणकार, शरद देशमुख, आशिष चंदनशिव, विजयकुमार ढगे, रामेश्वर दारशेवाढ, अस्लम शेख, आशुतोष चव्हाण आदींनी पुढाकार घेतला.

Web Title: Jalna's team won the football tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.