महादेवाच्या पिंडीची बाभळगाव येथे प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:38 IST2021-02-17T04:38:35+5:302021-02-17T04:38:35+5:30

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथे ईटकळ येथील ह.भ.प. नागनाथ स्वामी यांनी महादेवाची ५० किलोची पिंड दिली असून, याची ...

Installation of Mahadev's pindi at Babhalgaon | महादेवाच्या पिंडीची बाभळगाव येथे प्रतिष्ठापना

महादेवाच्या पिंडीची बाभळगाव येथे प्रतिष्ठापना

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथे ईटकळ येथील ह.भ.प. नागनाथ स्वामी यांनी महादेवाची ५० किलोची पिंड दिली असून, याची प्रतिष्ठापना १६ फेब्रुवारीला हनुमान मंदिरात करण्यात आली.

यानिमित्त सकाळी १० वाजता ह.भ.प. नागनाथ स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली अमर पाटील यांनी सपत्निक पिंडाचा अभिषेक केला. यानंतर दिवसभर भजन, कीर्तन, गवळणी, भारूड आदी कार्यक्रमांचे आयोजन करून गावकऱ्यांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. यासाठी शामराव धनवडे, दत्ता धरणे, सुभाष बिराजदार, बलभीम बिराजदार, जितेंद्र पाटील, भारत पाटील, महादेव गायकवाड, नागनाथ कांबळे, अर्जुन महाबोले, नागाबाई इटलकर, प-यागबाई सातपुते, लोचना बिराजदार, शारूबाई जाधव, नाना गवारे यांच्यासह जय हनुमान भजनी मंडळ व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.

फोटो---

१) बाभळगाव येथे महादेवाच्या पिंडीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी अभिषेक करताना सपत्नीक अमर पाटील.

२) बाभळगाव येथे महादेवाच्या पिंडीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी नागनाथ स्वामी, शामराव धनवडे, अमर पाटील, सुभाष बिराजदार, भारत पाटील, महादेव गायकवाड, अर्जुन महाबोले आदी.

Web Title: Installation of Mahadev's pindi at Babhalgaon