आत्महत्येस प्रवृत्त केले, तिघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:31 IST2021-09-13T04:31:36+5:302021-09-13T04:31:36+5:30

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, चिंचाेली काटे येथील आबाजी मुरलीधर बिराजदार आणि तावशीगड येथील उमेश बाबुराव बिराजदार ...

Induced suicide, crime against three | आत्महत्येस प्रवृत्त केले, तिघांविरुद्ध गुन्हा

आत्महत्येस प्रवृत्त केले, तिघांविरुद्ध गुन्हा

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, चिंचाेली काटे येथील आबाजी मुरलीधर बिराजदार आणि तावशीगड येथील उमेश बाबुराव बिराजदार यांच्या शेतरस्ता रहदारीसंबंधी वाद हाेता. मागील काही दिवसांपूर्वी उमेश बिराजदार यांनी त्यांच्या शेतालगत असलेला रस्ता दार व कुलूप लावून बंद करून आबाजी यांना शेतात येण्या-जाण्याला अडथळा केला. उमेश यांसह गावकरी कमलबाई पवार, दादासाहेब पवार, पांडुरंग गिरी, अनंत गिरी, इंदुबाई गिरी अशा सहा जणांनी आबाजी यांच्या घरी जावून शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच वेळाेवेळी मानसिक त्रास दिला. त्यांच्या या त्रासाला कंटाळूनच आबाजी यांनी घरात आत्महत्या केली, अशी फिर्याद मयताची पत्नी सविता बिराजदार यांनी लाेहारा पाेलीस ठाण्यात दिली. त्यावरून ११ सप्टेंबर राेजी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Web Title: Induced suicide, crime against three