माेठ्या गावांत काेराेनाचा वाढताेय संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST2021-05-07T04:34:11+5:302021-05-07T04:34:11+5:30

भूम : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार विविध उपाययाेजना केल्या जात आहेत. असे असतानाही खासकरून माेठ्या गावांत काेराेनाने तीव्र ...

Increasing infection of caries in my village | माेठ्या गावांत काेराेनाचा वाढताेय संसर्ग

माेठ्या गावांत काेराेनाचा वाढताेय संसर्ग

भूम : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार विविध उपाययाेजना केल्या जात आहेत. असे असतानाही खासकरून माेठ्या गावांत काेराेनाने तीव्र स्वरूप धारण केले आहे. हा प्रश्न लक्षात घेऊन तहसीलदारांनी अशा गावांत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. परंतु, स्थानिक लाेक फारशी खबरदारी घेत नसल्याने धाेका आणखी वाढत आहे.

तालुक्यात मार्च महिन्यापासून काेराेनाचे रुग्ण आढळून येत आहेत. दिवसागणिक बाधितांच्या संख्येत भर पडत आहे, तर दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. आजअखेर चिंचपूर ढगे येथे ९७ रुग्ण आढळून आले आहेत. यात ७७ जण काेराेनामुक्त झाले, तर २० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. माणकेश्वर येथे ७६ रुग्ण आढळून आले. यातील ४७ जणांनी काेराेनावर मात केली. त्यामुळे सध्या २९ जणांवर उपचार करण्यात येत आहेत. देवळाली येथेही ६१ रुग्ण आढळून आले असता, ११ जणांनी काेराेनाला हरविले. परिणामी सध्या ४९ जणांवर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, लहान-माेठ्या गावांत वाढत चाललेला काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी तहसील प्रशासनाकडून ज्या गावात दहापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत, तेथे जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी नियमांचे काटेकाेरपणे पालन करावे, असे आदेशितही केले. गावाेगावी याच्या उलट चित्र पाहावयास मिळत आहे. लाेक बेफिकीरपणे वावरत आहेत. त्यामुळे काेराेनाचा धाेका कमी हाेण्याऐवजी वाढत असल्याचे दिसून येते. साेबतच स्थानिक कर्मचारीही पहिल्या लाटेप्रमाणे काटेकाेरपणे उपाययाेजना करताना दिसत नाहीत. ग्रामपंचायतींचे पदाधिकारीही माेहिमेपासून दूर राहणेच पसंत करीत आहेत. हा प्रकार कुठेतरी थांबायला हवा.

चाैकट...

भूम शहरातही वर्दळ...

ग्रामीण भागासाेबतच भूम शहरामध्येही दिवसभर वर्दळ पाहावयास मिळते. ग्रामीण भागातून कामासाठी येणारे अनेक लाेक मास्कही लावत नाही. फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याकडेही डाेळेझाक केली जात आहे. परिणामी काेराेनाचा धाेका वाढण्याची दाट शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन नगर पालिकेने पुढे येऊन उपाययाेजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. अन्यथा हे असेच सुरू राहिल्यास काेराेनाचा संसर्ग कमी हाेण्याऐवजी वाढत जाईल, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Increasing infection of caries in my village