‘फार्मट्रॅक’च्या आऊटलेटचे वाशी येथे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:01 IST2021-02-21T05:01:51+5:302021-02-21T05:01:51+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील वाशी येथे शिवजयंतीच्या मुहूर्तावर फार्मट्रॅकचे अधिकृत विक्रेते मधू सेल्स काॅर्पोरेशनच्या वतीने ११ ट्रॅक्टर्सचे वितरण करून व्यवसायाचा ...

‘फार्मट्रॅक’च्या आऊटलेटचे वाशी येथे उद्घाटन
उस्मानाबाद : जिल्ह्यातील वाशी येथे शिवजयंतीच्या मुहूर्तावर फार्मट्रॅकचे अधिकृत विक्रेते मधू सेल्स काॅर्पोरेशनच्या वतीने ११ ट्रॅक्टर्सचे वितरण करून व्यवसायाचा प्रारंभ करण्यात आला.
वाशी येथील या नवीन आऊटलेटचे उद्घाटन सुरेश कवडे व एस्कॉर्ट लि. चे महाराष्ट्र राज्य विक्री प्रमुख अनिल शेवाळे यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी पारगावचे माजी सरपंच राजाभाऊ आखाडे, ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश मुकुंद सस्ते, भूमच्या एस. पी. कॉलेजचे प्राचार्य शाहू बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या शोरूममुळे वाशी परिसरातील शेतकरी बांधवांची सोय होणार आहे. वाशी येथील रामबाग कॉलेज रोडवर हे आऊटलेट सुरू झाले असून, येथे कंपनीचे १५ एचपीपासून ७२ एचपीपर्यंत ट्रॅक्टर माॅडेल्स उपलब्ध असल्याची माहिती मधू सेल्स कार्पोरेशनच्या संचालिका धनश्री मुकुंद सस्ते (येडशीकर) यांनी दिली. (वाणिज्य वार्ता)