शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार एकर क्षेत्रावर सहाशे किलो बियाण्याद्वारे साकारली शरद पवार यांची प्रतिमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 23:33 IST

अष्टपैलू आर्टीस्ट मंगेश निपाणीकर यांनी अशी विक्रमी कलाकृती सादर करूण शरद पवार यांना दिलेल्या शुभेच्छाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.

- बालाजी आडसूळकळंब (जि. उस्मानाबाद) : विस्तीर्ण असं साडे चार एकर क्षेत्र...यात पंधरा दिवसाची पेरणीपूर्व मशागत करून त्यावर केलेलं आखीव-रेखीव रेखांकन... यात आठ दिवसापूर्वी विविध बियाणांची केलेली पेरणी...हे बीज अंकुरलं अन् साकार झाली तब्बल १ लाख ८० हजार स्क्वेअर फूट आकाराची शरद पवार यांची प्रतिमा. अष्टपैलू आर्टीस्ट मंगेश निपाणीकर यांनी अशी विक्रमी कलाकृती सादर करूण शरद पवार यांना दिलेल्या शुभेच्छाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.गत पाच दशकं गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या राजकीय सारीपाटावरील एक महत्वाचं व्यक्तिमत्त्व म्हणून शरद पवार यांना गणलंं जातं. त्यांच्यावरती प्रेम करणारे असंख्य चाहते राज्यभर आहेत. मात्र निपाणी (ता.कळंब) येथील भूमिपूत्र व राज्यभर एक अष्टपैलू आर्टीस्ट म्हणून नावलौकिक मिळवलेल्या मंगेश अनिरुद्ध निपाणीकर या कलाप्रेमीने  अफलातून कलाकृती सादर करत पवारांना आगळ्याावेगळ्या शुुभेच्छा दिल्याा आहेत. निमित्त होते राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे. ऐंशी वर्षाचे शरद पवार मराठी मुलूखातील एक ज्येष्ठ नेते असले तरी आजही ते असंख्य तरूणाईसाठी एका दिपस्तंभाप्रमाणे कार्यरत आहेत. गुरूवारी राज्यभर पवार यांचा वाढदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता.मात्र पवारांच्या कर्तृत्वाने भारावून गेलेल्या मंगेश निपाणीकर या तरूण कलाकाराने यंदाचा शरद पवार यांचा वाढदिवस आपल्या कलाकृतीद्वॉरे ‘स्पेशल’ करण्याचा संकल्प केला होता. यासाठी त्यांनी ‘ग्रास पेटींग’ या कला माध्यमांची निवड केली. फक्त यावेळी तृणाऐवजी तरकारी व खाद्यान्न प्रवगार्तील बियाण्यांचा वापर करत अंकुरलेल्या बिंजाकुराच्या माध्यमातून पवार ‘साहेब’ साकारण्याचा प्रयत्न सुरू केला. यासाठी गावातील सुरेश पाटील व बाळासाहेब पाटील या बंधूच्या निपाणी-नायगाव रस्त्यावरील क्षेत्राची निवड केली. जवळपास साडेचार एकर क्षेत्राची पंधरा दिवस पेरणीपूर्व मशागत केली. यानंतर या जमिनीवर शरद पवार यांची प्रतिमा साकार करण्यासाठी तंतोतंत रेखांकन करण्यात आले. हे रेखांकन ग्राफिक्स डिझाईनवर बेतलेलं होतं. यासाठी विविध आकारमानं परिणामकारकरित्या मांडण्यात आली. आणि ४ डिसेंबरला यामध्ये कल्पकरित्या बियाणं पेरण्यात आलं. चांगली उगवणक्षमता होण्याकरीता ओलाव्याची काळजी घेतली. याकरीता आवश्यक त्या आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. गुरुवारी केलेल्या कष्टाला यश आले. अखेर सकाळपासून अंकूर फुटण्यास सुरूवात झाली. पुरेसे बिंजाकूर दृष्टीपथात आल्यानंतर आकाशातून यावर नजर टाकली असता साकार झाली ती ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रतिमा.

 ६०० किलो बियाण्यांचा वापर.....मंगेश निपाणीकर यांनी या कलाकृतीसाठी एकूण पाच प्रकारच्या वाणांच्या ६०० किलो बियाण्यांचा वापर केला आहे. यात २०० किलो अळीव, ३०० किलो मेथी, ४० किलो गहू, ४० किलो ज्वारी व २० किलो हरभरा असा वापर करण्यात आला आहे.

१ लाख ८० स्क्वेअर फुटाची भव्य प्रतिमा...मंगशे निपाणीकर यांनी  ‘ग्रास पेटींग’ कलाप्रकारातून गतवर्षी देशातील पहिली अशी निलंगा (जि. लातूर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची साडेसहा एकर क्षेत्रावर, अडीच लाख स्क्वेअर फूट आकाराची भव्य प्रतिमा साकारली होती. यानंतर उपरोक्त कलाप्रकारात त्यांची निपाणी येथे १ लाख ८० स्क्वेअर फूट आकाराची साकार केलेली शरद पवार यांची ही दुसरी विक्रमी कलाकृती आहे. गत पंधरा दिवसांपासून घेतलेल्या अथक परिश्रमाला अगदी ‘१२/१२’ ची योग्य टायमींग साधण्याची कसरत करावी लागली. यास गुरूवारी दुपारनंतर यश आले. ही कलाकृती पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

 शेतक-यांच्या पिकाद्वारे शुभेच्छायासंदर्भात मंगेश निपाणीकर यांनी शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यांचे शेती क्षेत्राच्या विकासासाठी मोठं योगदान आहे. देशाचे दहा वर्ष कृषि मंत्री असलेल्या अशा नेत्यांस एक शेतकरी पूत्र म्हणून मी शेती पिकांतून प्रतिमा साकारून शुभेच्छा दिल्या आहेत, असे ‘लोकमत’शी बोलतांना ते म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारOsmanabadउस्मानाबाद