शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास रस्त्यावर उतरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:43 IST2021-01-08T05:43:55+5:302021-01-08T05:43:55+5:30

राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय ...

If we don't give justice to the farmers, we will take to the streets | शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास रस्त्यावर उतरू

शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास रस्त्यावर उतरू

राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिल मेश्राम, प्रदेशाध्यक्ष अर्जुनराव गालफाडे, राष्ट्रीय महासचिव आनंद नायर, प्रदेश महिला सरचिटणीस किरण बीडकर, प्रदेश सरचिटणीस मारुती गायकवाड, प्रवक्ते शामराव भगत, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष बळीराम बनसोडे, कैलास साबळे विदर्भ विभागीय अध्यक्ष संजय पातोडे, राहुल डिंपलवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

निटुरे म्हणाले, शेतकऱ्यांना केंद्र व राज्याकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही. विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची मागणी केली होती. मात्र, आता स्वतः मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी केलेल्या मागणीची पूर्तता होत नाही, हे शेतकऱ्यांचे व राज्याचे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांना विज बिल माफ करणे आवश्यक आहे. तसेच बऱ्याच वर्षांपासून रखडलेली कर्जमाफी तात्काळ करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत २०२४ पर्यंत गावच्या सर्व समस्या कशा सुटतील, यासाठी आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नामांतर, केवळ राजकीय स्टंटबाजी

नामांतर ही केवळ राजकीय स्टंटबाजी असून, त्यामुळे कुठलेही प्रश्न सुटणार नाहीत किंवा कोणाला रोजगार देखील मिळणार नाही. केवळ विकासाचे मुद्दे दुर्लक्षित व्हावेत यासाठीच ही सुरु करण्यात आलेली व असलेली राजकीय पक्षांची स्टंटबाजी असल्याची टीका निटुरे यांनी केली.

यावेळी गालफाडे यांनी पक्षाची भूमिका विशद करून या पक्षाचे काम तळागाळातील सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याचे सांगितले. आनंद नायर यांनी या पक्षाचा विस्तार लवकरच देशपातळीवर होऊन शेतकरी व कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद करणार असल्याचे सांगितले.

अनिल मेश्राम यांनी लॉकडाऊनच्या काळात गोरगरिबांना या पक्षाच्या माध्यमातून मदत केल्याचे सांगितले. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील रस्ते अतिशय खराब झाले असून, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

चौकट

पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी बळीराम बनसोडे, महिला विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी किरण बिडकर, प्रदेश चिटणीसपदी रमेश खोसे, नागपूर शहराध्यक्षपदी राहुल डिंपलवाड, व विदर्भ विभागीय अध्यक्षपदी संजय झं यांच्या नियुक्त्या करून त्यांना निवडीचे पत्र उपस्थितांच्या हस्ते देण्यात आले.

Web Title: If we don't give justice to the farmers, we will take to the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.