आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:37 IST2021-09-12T04:37:16+5:302021-09-12T04:37:16+5:30

अध्यक्षस्थानी प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य प्रवीण गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव ...

Ideal teacher, felicitation of meritorious students | आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अध्यक्षस्थानी प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य प्रवीण गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव दिलीप भालेराव, उमरगा नगर परिषद नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, मुरूम नगर परिषद नगराध्यक्षा अनिता अंबर, लोहारा पंचायत समिती सभापती हेमलता रणखांब, मुरूम पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक रंगनाथ जगताप, नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक उमाकांत देशपांडे, भालचंद्र लोखंडे आदी उपस्थित होते.

यावेळी संस्थेतील २५० पैकी ८ शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात आले. यात पी. एस. आष्टगे, आर. व्ही. स्वामी, एस. एस.कांबळे, एस. एस.नाकाडे, के. एम. टोपगे, एस. एच. मुर्गे, एस. बी. सुतार, आर. सी. गुर्वे यांचा समावेश आहे. तसेच दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या एकूण २६ विद्यार्थ्यांचा शाल, फेटा, पुष्पहाराणे सत्कार करून गौरविण्यात आले. बारावीच्या विज्ञान शाखेतून ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या २१ विद्यार्थ्यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

किरण गायकवाड यांनी प्रास्ताविक, उल्हास घुरघुरे यांनी सूत्रसंचालन केले. राम डोंगरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी मुरूम शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधीर चव्हाण, उमरगा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राहुल वाघ, प्रशांत मुरूमकर, गोडबोले, श्रीहरी शिंदे पाटील, महेश शिंदे, शरण पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजू मुल्ला, खालिद भाजीवाला, दिगंबर सोनटक्के आदींनी पुढाकार घेतला.

Web Title: Ideal teacher, felicitation of meritorious students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.