काेराेना राेखणार कसा? आराेग्यसेवकांच्या तीनशे, डाॅक्टरांच्या ५० टक्के जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:31 IST2021-04-10T04:31:51+5:302021-04-10T04:31:51+5:30

उस्मानाबाद -जिल्ह्यात दिवसागणिक काेराेना बाधितांच्या संख्येत भर पडत आहे. या महामारीचा सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी आराेग्य यंत्रणा तितकीच भक्कम असणे ...

How to keep Kareena? Three hundred vacancies for health workers and 50 per cent vacancies for doctors | काेराेना राेखणार कसा? आराेग्यसेवकांच्या तीनशे, डाॅक्टरांच्या ५० टक्के जागा रिक्त

काेराेना राेखणार कसा? आराेग्यसेवकांच्या तीनशे, डाॅक्टरांच्या ५० टक्के जागा रिक्त

उस्मानाबाद -जिल्ह्यात दिवसागणिक काेराेना बाधितांच्या संख्येत भर पडत आहे. या महामारीचा सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी आराेग्य यंत्रणा तितकीच भक्कम असणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र ही अक्षरश: यंत्रणा खाेकली बनली आहे. आजघडीला जिल्ह्यातील आराेग्य केंद्रांना तब्बल तीनशेवर आराेग्यसेवक, सेविकांची गरज आहे. एवढेच नाही तर डाॅक्टरांच्याही ५० टक्के जागा रिक्त आहेत. काेविड टेस्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लॅब टेक्निशियनचा तर विचार न केलेलाच बरा. एकाही आराेग्य केंद्रात नियमित टेक्निशियन नाहीत. मनुष्यबळाच्या बाबतीत हे चित्र असेच राहिल्यास काेराेना राेखणार कसा? असा प्रश्न काेणालाही पडल्याशिवाय राहणार नाही.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून काेराेना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ हाेऊ लागली आहे. त्यानुसार प्रशासनाकडून काेविड केअर सेंटरची संख्याही वाढविण्यात येत आहे. काेराेनाची बाधा झालेल्या व्यक्तीवर तातडीने उपचार सुरू करता यावेत, यासाठी आता आराेग्य केंद्रांच्या माध्यमातूनही काेविड टेस्ट करण्यात येऊ लागल्या आहेत. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींनाही पथकांच्या माध्यमातून तातडीने ट्रेस करून चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. हे काम अधिक प्रभावी व व्यापक स्वरूपात व्हावे, यासाठी आराेग्य यंत्रणाही तितकीच मजबूत असणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र याच्या उलट चित्र पाहावयास मिळत आहे. डाॅक्टरांसह अन्य आराेग्य कर्मचाऱ्यांच्या मंजूर जागांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता आराेग्य यंत्रणा मजबूत दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र रिक्त जागांमुळे खाेकली बनली आहे. डाॅक्टरांनंतर आराेग्य केंद्रात आराेग्य सेवक, सेविका महत्त्वाची भूमिका बजावतात, परंतु मागील काही महिन्यांपासून या पदाच्या तब्बल ३०० वर जागा रिक्त आहेत. हे थाेडके म्हणून की काय, ‘एमबीबीएस’धारक नियमित डाॅक्टरांच्या ५० टक्के जागा रिकाम्याच आहेत. त्यामुळे या ठिकाणी ‘बीएएमएस’धारक डाॅक्टरांची तात्पुरती नेमणूक करून ‘आराेग्य’चा गाडा हाकण्याची वेळ प्रशासनावर ओढावली आहे.

काेराेनाचा संसर्ग झालेला व्यक्ती तातडीने समाेर यावा, यासाठी जिल्हा, तालुकास्तरासाेबतच आता प्राथमिक आराेग्य केंद्रातही काेविड चाचण्या करण्यात येऊ लागल्या आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या प्रतिदिन दीड हजारावर जाऊन ठेपली आहे. चाचण्याचे प्रमाण वाढवावे, असे शासनाकडून वेळाेवेळी सांगितले जात असले तरी यासाठीच्या तज्ज्ञ मनुष्यबळाची माेठी कमतरता आहे. प्रत्येक आराेग्य केंद्रास एका लॅब टेक्निशियनची गरज असतानाही ४४ पैकी एकही आराेग्य केंद्रावर नियमित टेक्निशियनचा पत्ता नाही. सध्या आराेग्य केंद्रांचा कारभार उसनवारीवर सुरू आहे. हिवताप विभागाचे १६ ते १७ टेक्निशियन घेण्यात आले आहेत. उर्वरित आराेग्य केंद्रामध्ये कधी आराेग्यसेवक तर कधी ‘सीएचओ’ ही जबाबदारी पार पाडत आहेत. काेराेना महामारीच्या काळात आराेग्य यंत्रणेची ही विदारक अवस्था असेल तर काेराेनाचे संकट परतवणार कसे? असा सवाल काेणालाही पडल्याशिवाय राहणार नाही, हे तितकेच खरे.

चाैकट...

आठ आराेग्य केंद्र वाऱ्यावर...

काेराेनाने सरकारसह यंत्रणेची झाेप उडविली असतानाच दुसरीकडे डाॅक्टरांविना आराेग्य केंद्रांचा कारभार हाकण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. जिल्ह्यातील सहा आराेग्य केंद्रांतील सुमारे आठ जागा निव्वळ रिक्त आहेत. या ठिकाणी पर्यायी डाॅक्टरांची साेय करणेही कठीण झाले आहे. यात येणेगूर, मुळज, जेवळी, काटगाव, आंबी तसेच ईट या आराेग्य केंद्रांचा समावेश आहे.

‘हिवताप’च्या १७ टेक्निशियनवर मदार...

जिल्हा परिषदेच्या प्रत्येक आराेग्य केंद्रास लॅब टेक्निशियनची एक जागा मंजूर आहे. तसा आराखड्यात उल्लेखही आहे. परंतु, आजघडीला एकाही केंद्राकडे नियमित टेक्निशियन नाही. ‘हिवताप’चे १७ टेक्निशियन उसनवारीवर घेण्यात आले आहेत. उर्वरित ठिकाणी आराेग्य सेवक, सेविका ही भूमिका पार पाडत आहेत. टेक्निशियनच नसतील, काम गतिमान हाेणार कसे? असा सवाल या निमित्ताने विचारला जाऊ लागला आहे.

लाेकप्रतिनिधी सक्रिय हाेणार कधी?

रस्ते, नाल्यांसह इमारती उभा करण्यासाठी थेट मंत्रालय गाठून निधी आणणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांची कमी नाही. राज्यात सेना सत्तेत आहे. सेनेच्या तिकिटावर निवडून आलेली मंडळी उपाध्यक्ष, सभापतींसारख्या महत्त्वाच्या पदावर विराजमान आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेला यांच्याकडून माेठ्या अपेक्षा आहेत. मात्र, अद्याप तरी या रिक्त जागांसाठी काेणी मंत्रालयात जाऊन ठाण मांडल्याचे ऐकिवात नाही.

काेट...

मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे काेविडच्या काळात अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असले तरी उपलब्ध मनुष्यबळावर चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. रिक्त जागा शासनाला वेळाेवेळी कळविण्यात आल्या आहेत.

-डाॅ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा आराेग्य अधिकारी.

Web Title: How to keep Kareena? Three hundred vacancies for health workers and 50 per cent vacancies for doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.