धक्कादायक ! तुळजापूर-लातूर महामार्गावर हॉटेलचालकावर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 14:14 IST2021-02-03T14:14:14+5:302021-02-03T14:14:38+5:30

या हॉटेलवर बुधवारी दुपारी पुणे पासिंग असलेल्या एका जीपमधून 6 तरुण आले होते.

Hotel owner shot on Tuljapur-Latur highway | धक्कादायक ! तुळजापूर-लातूर महामार्गावर हॉटेलचालकावर गोळीबार

धक्कादायक ! तुळजापूर-लातूर महामार्गावर हॉटेलचालकावर गोळीबार

उस्मानाबाद : तुळजापूरहून लातूरकडे जाणाऱ्या महामार्गावरील भंडारी शिवारात एका हॉटेलचालकावर दोन गोळ्या झाडल्याची घटना आज दुपारी घडली आहे. यात हाटेलचालक किरकोळ जखमी झाले असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

लातूरकडे जाणाऱ्या महामार्गावर भंडारी शिवारात बाळासाहेब दामोदर मोरे यांचे हॉटेल आहे. या हॉटेलवर बुधवारी दुपारी पुणे पासिंग असलेल्या एका जीपमधून 6 तरुण आले होते. त्यांनी मोरे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर एकाने त्याच्याकडील बंदूक काढून समोरून 2 गोळ्या झाडल्या. त्या चुकविण्याचा प्रयत्न मोरे यांनी केल्याने ते किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर 5 व्यक्ती जीपमधून पसार झाल्या. तर प्रत्यक्षदर्शींनी यातील एकास पकडून ठेवले आहे.

घटनेची माहिती प्राप्त होताच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन घाडगे, बेंबळी ठाण्याचे सहायक निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी रवाना झाले आहेत. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणास्तव झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मोरे हे रिअल इस्टेट व्यवसायातही आहेत, त्यातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे.

Web Title: Hotel owner shot on Tuljapur-Latur highway