विविध क्षेत्रांतील महिलांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:44 IST2021-01-08T05:44:41+5:302021-01-08T05:44:41+5:30
उमरगा : येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात ...

विविध क्षेत्रांतील महिलांचा सत्कार
उमरगा : येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी शालेय समितीच्या अध्यक्षा शकुंतला मोरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्याम भोसले, मुख्याध्यापक पद्माकर मोरे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मीनाक्षी दुबे, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवा निवृत्त मुख्याध्यापिका प्रभावती जाधव, वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सुरेखा मलंग, कोरोना काळात आयसीयू विभागात ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. सुनंदा आळंगेकर, रोटरीच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणातून तज्ज्ञ शिक्षकांमार्फत मार्गदर्शन करणाऱ्या उमरगा रोटरीच्या अध्यक्षा कविता अस्वले यांचा सत्कार शालेय समितीच्या अध्यक्षा शकुंतला मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गेल्या महिनाभरापासून शालेय परिसर स्वच्छ करणाऱ्या नगर परिषदेच्या श्रमिक कामगार महिला कानबाई खराते, लक्ष्मी भालेराव, वर्षाबाई जाधव, मंगल भालेराव, सुमन बनसोडे, गंगा बनसोडे, अनुसया कांबळे, शालेय पोषण आहार वाटप करणाऱ्या सुमन साठे, कविता केदारे, परिचारिका सुनीता राठोड यांनाही यावेळी गौरविण्यात आले.
कार्यक्रमासाठी क्रीडा शिक्षक बाबासाहेब जाधव, बशीर शेख, चंद्रशेखर पाटील, बलभीम चव्हाण, संजय रूपाजी, सदानंद कुंभार, एफ. एम. पटेल, सोनाली मुसळे, चंदनशिवे शिल्पा, अश्विनी पडघम यांनी पुढाकार घेतला. प्रास्ताविक मुख्याध्यापक पद्माकर मोरे, सूत्रसंचालन सरिता उपासे यांनी केले, तर आभार ममता गायकवाड यांनी मानले.