‘वीर कराटे’च्या वतीने महिला पालकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:57 IST2021-03-13T04:57:39+5:302021-03-13T04:57:39+5:30
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर ...

‘वीर कराटे’च्या वतीने महिला पालकांचा सन्मान
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर महिला पालकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महिला पालक, तसेच कराटे प्रशिक्षणार्थी मुलींनी मनाेगत व्यक्त केले. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण द्यायला हवे, असे मत महिला पालकांनी व्यक्त केले. यावेळी सुवर्णा कैवाडे, पल्लवी माळे, सोनाली कापसे, सारिका चंडेले, कमल चव्हाण, वर्षा पिसे, कल्पना वाघमारे, निमिशा कप्रातवार, कीर्ती पाटील, अपर्णा पाटील, गौरी पराळेकर, अल्का गवाने, प्रभावती निनेवड, प्रियंका रवाळे, मनीषा गंगावणे, आरती महामुने, चित्रलेखा कठारे, सुवर्णा शिवाळकर, अदिती पवार, प्रिया बाराते, लता बाराते, कविता यादगिरे यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर कराटे प्रशिक्षणार्थी सिद्धी वाघमारे, अंकिता बनाळे, वैष्णवी चंडेले, सृष्टी कैवाडे, अदिती पाटील, रिचा तपाडिया, शुभ्रा पवार, अवंतिका अगाळे, अदिती कापसे, केतकी रवाळे, सिद्धी काकडे, श्रेया शेवाळकर, अनुष्का कठारे, स्वरा बाराते, मोक्षदा हांचाटे आदींनी मनाेगत व्यक्त केले. हा कार्यक्रम कराटे कोच डॉ. मनोज पतंगे यांनी आयोजित केला हाेता.