प्रबुद्ध रंगभूमीच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:57 IST2021-03-13T04:57:48+5:302021-03-13T04:57:48+5:30
कळंब : शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार प्रबुद्ध रंगभूमी संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके यांच्या हस्ते करण्यात ...

प्रबुद्ध रंगभूमीच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
कळंब : शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार प्रबुद्ध रंगभूमी संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे ह.भ.प. महादेव आडसूळ महाराज, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष किरण मस्के, भाऊ कुचेकर, उपसंपादक माधवसिंग राजपूत उपस्थित होते.
यावेळी डॉ. संजीवनी जाधवर, डॉ. अश्विनी पवार, डॉ. एस. एम. शेख, डॉ. शीतल कुंकुलोळ, महिला उद्याेजिका किरण कर्णावट, सहशिक्षिका सरस्वती आडसूळ, छाया पाखरे, सामाजिक कार्यकर्त्या शोभा मस्के, अंगणवाडी कार्यकर्त्या बेबी आयशा जावेद शेख, पंचशीला मस्के, मीरा लिमकर, रेखा राजाभाऊ वाघमारे, सज्जा आडसूळ, मंगल गायकवाड आदींना प्रबुद्ध रंगभूमी बहुद्देशीय संस्था कळंबच्या वतीने समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन अविनाश घोडके यांनी केले.