येथील जिल्हा परिषदेची माध्यमिक शाळा ही आंतरराष्ट्रीय शाळा झाली असून, सलग पाच वर्षांपासून येथील विद्यार्थी विविध परीक्षेत यश मिळवित आहेत. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी हा सोहळा घेण्यात आला. यावेळी स्नेहा चोरमले, सार्थक माने, गायत्री हुंबे, मधुरा आसलकर, महिंद्रा असलकर या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीधारक झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सुनील देशमुख, उपसरपंच पती अविनाश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाभाऊ हुंबे, सुरेंद्र बोंदाडे, शंभूराजे देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक पांडुरंग कवडे, उमेश कुरलकर, सहदेव हुंबे, सातपुते, चव्हाण आदींनी पुढाकार घेतला. दरम्यान, येथील सिद्धी प्रतापराव देशमुख ही एका वर्षापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवण्याचे काम करीत असल्याबद्दल तिचाही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय शाळेतील गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:35 IST