गुणवंत खेळाडू, मार्गदर्शक, संघटकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:14 IST2021-02-05T08:14:58+5:302021-02-05T08:14:58+5:30

उस्मानाबाद : क्रीडा क्षेत्रात सन्मानाचा समजला जाणारा जिल्हा क्रीडा पुरस्काराने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे गुणवंत खेळाडू, मार्गदर्शक, संघ ...

Honor of meritorious players, mentors, organizers | गुणवंत खेळाडू, मार्गदर्शक, संघटकांचा सन्मान

गुणवंत खेळाडू, मार्गदर्शक, संघटकांचा सन्मान

उस्मानाबाद : क्रीडा क्षेत्रात सन्मानाचा समजला जाणारा जिल्हा क्रीडा पुरस्काराने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे गुणवंत खेळाडू, मार्गदर्शक, संघ संघटकांचा प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक राैशन, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, आदींची उपस्थिती होती.

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०१७-१८ मध्ये गुणवंत खेळाडू (पुरुष) अमितकुमार राचलिंग भागुडे (आट्या- पाट्या), गुणवंत खेळाडू (महिला) ऋतुजा विठ्ठल खरे (खो-खो), गुणवंत क्रीडा मार्गदर्शक राजाभाऊ विष्णू शिंदे (आट्या- पाट्या), गुणवंत क्रीडा संघटक मन्मथ भगवानराव पाळणे यांचा समावेश आहे. तसेच जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०१८-१९ मध्ये गुणवंत खेळाडू पुरुष श्रीधर राजकुमार सोमवंशी, (तलवारबाजी), गुणवंत खेळाडू (महिला) शितल बापूराव ओव्हाळ (आट्या-पाट्या), गुणवंत क्रीडा मार्गदर्शक संजय मनोहर देशमुख (व्हॉलिबॉल ), गुणवंत क्रीडा संघटक राजेश रेश्मा बिलकुले या खेळाडूंचा समावेश आहे.

Web Title: Honor of meritorious players, mentors, organizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.