गणेश मंडळाच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST2021-09-22T04:36:02+5:302021-09-22T04:36:02+5:30
अध्यक्षस्थानी तामलवाडी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. सचिन पंडित तर प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटीचे चेअरमन सुधाकर शेळके उपस्थित होते. या वेळी ...

गणेश मंडळाच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान
अध्यक्षस्थानी तामलवाडी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. सचिन पंडित तर प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटीचे चेअरमन सुधाकर शेळके उपस्थित होते. या वेळी कोरोना कक्षाचे प्रमुख जोतिबा जाधव, महावितरणचे गणेश पांचाळ, ग्रामपंचायतचे महादेव माळी, आशा कार्यकर्ती अर्चना मगर, अंगणवाडीच्या सुनंदा मगर, तारामती गायकवाड, पूजा मगर, पुष्पा मगर, लक्ष्मी मगर, बीट अंमलदार गोरोबा गाढवे आदींचा सत्कार तसेच मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास मंडळाचे मार्गदर्शक महेश पाटील, अध्यक्ष उमेश रोकडे, उपाध्यक्ष विष्णू मगर, सचिव रामदास मगर, श्रीकांत कुलकर्णी, दीपक पाटील, नागनाथ मगर, विश्वजीत पाटील, श्रीधर कुलकर्णी, प्रवीण पाटील, राजकुमार शेळके, आप्पाराव मगर, येताळ मगर, सतीश मगर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अण्णासाहेब मगर यांनी केले. चौकट शेतकऱ्यांचा झाला सत्कार या वेळी माळुंब्रा येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी महादेव वडणे यांची महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे विभागाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल तसेच गोंधळवाडीचे सरपंच राजाभाऊ मोटे यांचाही मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.