हिवर्डा शिवारातील दारू अड्डा उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:31 IST2021-05-17T04:31:26+5:302021-05-17T04:31:26+5:30
हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डाेंगराच्या बाजुला असलेल्या शेतात एक व्यक्ती अवैधरित्या दारू बाळगून विक्री करीत असल्याची गाेपनीय माहिती स्थानिक गुन्हे ...

हिवर्डा शिवारातील दारू अड्डा उद्ध्वस्त
हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डाेंगराच्या बाजुला असलेल्या शेतात एक व्यक्ती अवैधरित्या दारू बाळगून विक्री करीत असल्याची गाेपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली हाेती. त्यानुसार १६ मे राेजी पाेनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेउपनि पांडुरंग माने, पाेहेकाॅ धनंजय कवडे, पाेना महेश घुगे, अमाेल चव्हाण, शेळके, पाेकाॅ. आरसेवाड यांच्या पथकाने दीड वाजेच्या सुमारास अचानक छापा मारला. यावेळी शेतातील पत्र्याच्या शेडच्या बाजुला श्रीराम मुंडे (रा. हिवर्डा) याच्याकडे नऊ खाेकी आढळून आली. ज्यामध्ये १८० मिली देशी दारूच्या ४३२ बाटल्या १८० मिली विदेशी दारूच्या १४८ बाटल्या, मध्य भरण्यासाठी दाेन कॅन असा एकूण ६३ हजार १४४ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तानाजी मुंडे याच्याविरूद्ध भूम पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.