मदत वाऱ्यावरच; रिक्षाचालकांना दीड हजार कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:34 IST2021-05-08T04:34:36+5:302021-05-08T04:34:36+5:30

प्रवासीच नाहीत तर घर कसे चालणार? कडक निर्बंधांमुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे दिवसभर रिक्षा बंद असते. अशा स्थितीत ...

Help in the wind; When will rickshaw pullers get Rs. | मदत वाऱ्यावरच; रिक्षाचालकांना दीड हजार कधी मिळणार?

मदत वाऱ्यावरच; रिक्षाचालकांना दीड हजार कधी मिळणार?

प्रवासीच नाहीत तर घर कसे चालणार?

कडक निर्बंधांमुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे दिवसभर रिक्षा बंद असते. अशा स्थितीत इतर काही काम करायचे म्हटले तर हाताला काम मिळत नाही. शासनाने जाहीर केलेली मदतही अद्याप मिळाली नाही.

- अमर शिंदे, रिक्षाचालक

संचारबंदीपूर्वी दिवसाकाठी ५०० रुपये व्यवसाय होत. त्यातील २५० रुपये डिझेलसाठी तर २५० रुपये रोजगार मिळत होता. मात्र, सध्या प्रवासी नसल्यामुळे तीन ते चार तासच रिक्षा चालवावी लागत आहे. त्यातून हाती केवळ १०० रुपये येत आहेत. शासनाची मदत मिळालेली नाही.

अतुल गवळी

रिक्षा मालक-चालक

मागील दोन-तीन महिने व्यवसाय सुरळीत चालू झाला होता. सकाळीत १० ते रात्री ८.३० पर्यंत रिक्षा चालवत होताे. यातून दिवसाला २५० ते ३०० रुपये रोजगार मिळत होता. संचारबंदीमुळे आता भाडेही मिळत नाही. शु्क्रवारी सकाळी १० वाजता रिक्षा पॉइंटला लावली असता केवळ २० रुपयांचे भाडे मिळाले. शासनाने तातडीने मदत द्यावी.

हाजी शेख,

रिक्षा मालक-चालक

Web Title: Help in the wind; When will rickshaw pullers get Rs.