आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:59 IST2021-02-06T04:59:45+5:302021-02-06T04:59:45+5:30

तेर : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त तेर येथील ...

Health department staff felicitated | आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार

आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार

तेर : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त तेर येथील महाराष्ट्र संत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कोरोना महामारीत आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, आशा स्वयंसेविका तसेच कोराना महामारीत सेवा देणाऱ्यांचा कोरोना योध्दा म्हणून गौरव करण्यात आला. कार्यक्रमास मुख्याध्यापक सतीश बळवंतराव, डॉ. विजय विश्वकर्मा, पुराणवस्तू संग्रहालये सहाय्यक अभिरक्षक अमोल गोटे, आशा सुपरवायझर शीतल जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ऋतिका सोमवसे हिचा सन्मान

(फोटो - दयानंद काळुंके ०४)

अणदूर : येथील जवाहर विद्यालयात नववीच्या वर्गात शिकणारी शहापूर येथील ऋतिका दत्तात्रय सोमवसे या विद्यार्थिनीची स्वलिखित ‘दरवळ’ या काव्यसंग्रहात १६ कविता या प्रकाशित झाल्या आहेत. त्याबद्दल मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे, उपमुख्याध्यापक विनोद कदम यांनी ऋतिका सोमवसे हिचा पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. याप्रसंगी ऋतिकाचे वडील दत्तात्रय सोमवसे, आई वर्षा सोमवसे, सहशिक्षक अनिल गुरव, सिध्देश्वर मसुते, क्रांती अंधारे, ज्योती चौधरी यांच्यासह विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

मामासाहेब जगदाळे जयंती साजरी

(फोटो - दत्ता पवार ०४)

येडशी : येथील जनता विद्यालयात डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची ११८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य जनक बेंद्रे, सरपंच गोपाळ नागटिळक, गजानन नलावडे, श्रीमंत नवले, तानाजी जाधव, उध्दव क्षीरसागर, पांडूरंग म्हेत्रे, रफिक पटेल, सलौद्दिन शेख यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मैदानावरील डबलबार, सिंगल बार याचे उद्घाटन करून ट्रामा केअर सेंटरसाठी देणगीचे आवाहन करण्यात आले. प्रास्ताविक वाय. एस. दोरकर व आभार योगेश उपळकर यांनी मानले.

Web Title: Health department staff felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.