आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:27 IST2021-01-17T04:27:43+5:302021-01-17T04:27:43+5:30
‘खांब उभारा’ उमरगा : शहरातील भारतनगर भागात आवश्यक प्रमाणात विद्युत खांब नसल्याने, अनेक ठिकाणी लाकडाचा आधार देण्याची वेळ आली ...

आरोग्य तपासणी
‘खांब उभारा’
उमरगा : शहरातील भारतनगर भागात आवश्यक प्रमाणात विद्युत खांब नसल्याने, अनेक ठिकाणी लाकडाचा आधार देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येथे आवश्यक ठिकाणी विद्युत खांब उभारावेत, अशी मागणी या भागातील रहिवाशांनी महावतरणकडे केली आहे.
रस्ते खड्डेमय
नळदुर्ग : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस स्थानक ते किल्लागेट या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे शहरवासीयांची गैरसोय होत असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
प्रवाशांची गैरसोय
लोहारा : मागील काही महिन्यांपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असून, अनेक गावांतील बाजार व इतर व्यवहारही आता सुरळीत होत आहेत, परंतु अजूनही ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी बस नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
सामाजिक उपक्रम
परंडा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना येथील छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठान व रामचंद्र पवार यांच्या वतीने भोजन व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले.