चांदीच्या मूर्तीची स्थापना करुन दिला प्रदूषण मुक्तीचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:31 IST2021-09-13T04:31:03+5:302021-09-13T04:31:03+5:30
शहरात श्री बसवेश्वर गणेश मंडळाची स्थापना १९९३ साली करण्यात आली. या मंडळाकडून इतर गणेश मंडळाप्रमाणे दरवर्षी वर्षाला नवीन अध्यक्षाची ...

चांदीच्या मूर्तीची स्थापना करुन दिला प्रदूषण मुक्तीचा संदेश
शहरात श्री बसवेश्वर गणेश मंडळाची स्थापना १९९३ साली करण्यात आली. या मंडळाकडून इतर गणेश मंडळाप्रमाणे दरवर्षी वर्षाला नवीन अध्यक्षाची निवड न करता एकच अध्यक्ष कायम आहे. दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न या मंडळाकडून केला जातो. आतापर्यंत वृक्ष संवर्धन स्पर्धा, रक्तदान, आरोग्य शिबिर, शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, समाज प्रबोधनपर कीर्तन यासह अनेक उपक्रम राबविले आहेत. याबद्दल पोलीस विभागाकडून मंडळाचा सन्मानही करण्यात आला आहे. दरवर्षी हजारो रुपये खर्च करुन गणेशमूर्ती आणायची आणि विसर्जन करायचे, यामुळे एकीकडे आर्थिक भार मंडळावर पडतो. शिवाय, प्रदूषण ही होते. यामुळे याला वेगळा पर्याय म्हणून चांदीची मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता. त्यानुसार मागील तीन वर्षांपासून येथे सुमारे पाच किलो वजनाच्या चांदीच्या मूर्तीची स्थापना केली जाते.
कोट........
यावर्षी कोरोनाचे संकट असतानाही सर्व नियमाचे पालन करुण श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यामध्ये नावीण्यपूर्ण बाब म्हणजे गेल्या तीन वर्षापासून प्रदूषण मुक्तीसाठी श्रींच्या चांदीच्या मूर्तीची स्थापना केली जात आहे. कोरोनाचे नियमाचे पाळण्या संदर्भात जनजागृती करण्याचे मंडळाने ठरविले आहे.
- वैजिनाथ माणिकशेट्टी, अध्यक्ष