दुकान फोडून शर्ट-पँट पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:26 IST2021-01-13T05:26:19+5:302021-01-13T05:26:19+5:30

उस्मानाबाद शहरातील माणिक चौकात सार्थक अंबुरे यांचे रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. या मुख्य रस्त्यावर रुग्णालये, पेट्रोल पंप असल्याने नेहमीच ...

He broke into the shop and stole his shirt and pants | दुकान फोडून शर्ट-पँट पळविले

दुकान फोडून शर्ट-पँट पळविले

उस्मानाबाद शहरातील माणिक चौकात सार्थक अंबुरे यांचे रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. या मुख्य रस्त्यावर रुग्णालये, पेट्रोल पंप असल्याने नेहमीच वर्दळ असते. तरीही चोरट्यांनी धाडसाने अंबुरे यांचे कपड्याचे दुकान सोमवारी पहाटेच्या सुमारास फोडले. आत काही रोकड हाती लागली नसल्याने त्यांनी कपड्यांकडे मोर्चा वळवून सुमारे ३९ हजार ७५० रुपये किंमतीचे शर्ट व पँट पळवून नेले. हा प्रकार सकाळी लक्षात आल्यानंतर अंबुरे यांनी आनंदनगर पोलिसांत तक्रार दिली. त्यावरुन चोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

१२ बोकड अन् ६ शेळ्यांची चोरी

उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील माणकेश्वर येथील एका शेतातून बोकड व शेळ्या चोरीस गेल्याची घटना घडली आहे. याबाबत सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. माणकेश्वर येथील वाहेद मुकबील यांच्या शेतातील शेडमध्ये त्यांनी १२ बोकड व ६ शेळ्यांचे संगोपन केले होते. दरम्यान, सोमवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हे बोकड व शेळ्या चोरुन नेल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वाहेद मुकबील यांनी परंडा ठाण्यात तक्रार दिली असून, चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: He broke into the shop and stole his shirt and pants