साैरपाट्या चाेरलेल्या दाेघांना बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:37 IST2021-07-14T04:37:24+5:302021-07-14T04:37:24+5:30

उस्मानाबाद : तालुक्यातील काैडगाव एमआयडीसीतील एका गाेडाऊनातून सुमारे दीडशेवर साैरपाट्या अज्ञाताने लंपास केल्या हाेत्या. चाेरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर ...

Handcuffs to the scars on the sails | साैरपाट्या चाेरलेल्या दाेघांना बेड्या

साैरपाट्या चाेरलेल्या दाेघांना बेड्या

उस्मानाबाद : तालुक्यातील काैडगाव एमआयडीसीतील एका गाेडाऊनातून सुमारे दीडशेवर साैरपाट्या अज्ञाताने लंपास केल्या हाेत्या. चाेरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर उस्मानाबाद ग्रामीण पाेलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध १० जुलै राेजी गुन्हा नाेंद झाला हाेता. यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची सूत्रे फिरवून अवघ्या चाेवीस तासांत चाेरट्यांना जेरबंद करण्यात आले.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील काैडगाव एमआयडीसी शिवारातील एका गाेडाऊनमध्ये साैरपाट्या ठेवण्यात आल्या हाेत्या. अज्ञात चाेरट्यांनी गाेदाम फाेडून आतील सुमारे १५० पाट्या लंपास केल्या. ही घटना १० जुलैपूर्वी घडली. दरम्यान, चाेरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर सुरक्षा पर्यवेक्षक शिवाजी पवार यांनी उस्मानाबाद ग्रामीण पाेलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला हाेता. यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तपासाची चक्रे फिरवित, अवघ्या चाेवीस तासांत काैडगाव येथील बालाजी दगडू थाेरात व हुसेन ईनूस सय्यद या दाेघांना ११ जुलै राेजी चाेरीच्या साेलार पाट्यांसह जेरबंद केले. यानंतर, दाेघा आराेपितांना पुढील कार्यवाहीसाठी उस्मानाबाद ग्रामीण पाेलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. उर्वरित साथीदारांचा पाेलीस शाेध घेत आहेत.

Web Title: Handcuffs to the scars on the sails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.