तुळजापुरात २५ लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:30 IST2021-02-14T04:30:11+5:302021-02-14T04:30:11+5:30
उस्मानाबाद : कर्नाटकातून बार्शीकडे गुटखा घेऊन जाणारा ट्रक तुळजापूर ठाण्याच्या ऑलआउट पथकाने गाेलाई चाैकात पकडला. ही कारवाई गुरुवारी रात्री ...

तुळजापुरात २५ लाखांचा गुटखा जप्त
उस्मानाबाद : कर्नाटकातून बार्शीकडे गुटखा घेऊन जाणारा ट्रक तुळजापूर ठाण्याच्या ऑलआउट पथकाने गाेलाई चाैकात पकडला. ही कारवाई गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी ट्रकचालकासह दाेघांविरुद्ध शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास गुन्हा नाेंद करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पाेलीस अधीक्षक राज तिलक राैशन व पाेलीस उपाधीक्षक टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ऑलआउट माेहीम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून अवैध धंदेचालकांसह गुन्हेगारांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. गुरुवारी रात्री साधारपणे १२ वाजेच्या सुमारास तुळजापूर शहरातील गाेलाई चाैकात पाेलीस उपनिरीक्षक बसवेश्वर चनशेट्टी व ऑलआउट पथकातील कर्मचारी कर्तव्यावर हाेते. याचवेळी एक ट्रक (केए.३२-डी.४१०२) चाैकातून जात हाेता. पाेउपनि चनशेट्टी यांना संशय आल्यानंतर त्यांनी हा ट्रक थांबविला. यानंतर आत पाहिले असता, ३२ पाेती आढळून आली. यानंतर पथकाने ट्रकचालक माेहन शिवाजी चाैधरी व अन्य एक यांच्याकडे चाैकशी केली असता, संशय बळावला. यानंतर आतील पाेत्यात पाहिले असता, गुटखा आढळून आला. सखाेल चाैकशीअंति हा गुटखा बार्शीकडे नेण्यात येत असल्याचे समाेर आले. यानंतर पाेलिसांनी मुद्देमालासह संबंधितांना ताब्यात घेतले. यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे प्रमाेदकुमार काकडे यांना बाेलवण्यात आले, असता संबंधित गुटख्याची किंमत सुमारे २४ लाख ५९ हजार २२० रुपये असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी चालक चाैधरी याच्यासह दाेघांविरुद्ध तुळजापूर ठाण्यात शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षक राज तिलक राैशन, पाेलीस उपाधीक्षक टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेउपनि चनशेट्टी यांच्या ऑलआउट पथकाने केली.