तुळजापुरात पुतळ्यास अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:30 IST2021-04-15T04:30:48+5:302021-04-15T04:30:48+5:30
तुळजापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम अनुयायांनी शहरातील मुख्य चौकातील पुतळ्यास विविध सामाजिक संघटना, पक्ष, संस्थांच्या वतीने ...

तुळजापुरात पुतळ्यास अभिवादन
तुळजापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम अनुयायांनी शहरातील मुख्य चौकातील पुतळ्यास विविध सामाजिक संघटना, पक्ष, संस्थांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अनेकांनी घरातच प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
तालुक्यातील तडवळा येथील सिद्धार्थ ग्रुपच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती माजी सभापती शिवाजीराव गायकवाड, वंचित आघाडीचे अरविंद चंदनशिवे, आकाश मस्के, अजय मस्के, औदुंबर मस्के, प्रवीण चंदनशिवे, बाबासाहेब चंदनशिवेसह आदी उपस्थित होते.
तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मिलिंद रोकडे, जीवन कदम, कमलेश कदम, किरण कदम, रवी साखरे आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रिपाइं रोजगार आघाडीच्या वतीने संजय शितोळे, आकाश मस्के आदींनी अभिवादन केले. तुळजापूर तालुका काँग्रेसच्या वतीने कॉंग्रेस तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक अमर मगर, युवक अध्यक्ष लखन पेंदे, ॲड. रामचंद्र ढवळे, विकास तांबे, बाळासाहेब कदम, विकास गायकवाड, चंद्रकांत लबडे, विकास हावळे, दीपक थोरात, फरीद शेख आदीनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे, धनंजय पाटील, तालुका युवक अध्यक्ष संदीप गंगणे, बबन गावडे, शहराध्यक्ष अमर चोपदार, सचिन कदम, शरद जगदाळे, नितीन रोचकरी, जनक पाटील, आप्पासाहेब पवार, महेश चोपदार, गणेश नन्नवरे, राजरत्न कदम आदींनी अभिवादन केले. नगर परिषदेच्या वतीनेही पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विनोद गंगणे, नगरसेवक विजय कंदले, पंडीतराव जगदाळे, औदुंबर कदम, हेमाताई कदम, विनोद पलंगे, अमर मगर, मुख्याधिकारी आशिष लोकरे आदी उपस्थित होते.