गुणवंत विद्यार्थ्यांचा भूममध्ये सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:34 IST2021-07-28T04:34:12+5:302021-07-28T04:34:12+5:30
भूम : येथील राणी तारा राजा प्रशालेत दहावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सचिव प्रभाकर रावगवकर, शालेय ...

गुणवंत विद्यार्थ्यांचा भूममध्ये सत्कार
भूम : येथील राणी तारा राजा प्रशालेत दहावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सचिव प्रभाकर रावगवकर, शालेय समितीच्या अध्यक्षा उषा विर्धे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कमलाकर बावीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेतून तोहीद गफार बेग व मेघा राजेश स्वामी यांनी प्रथम, स्नेहल कैलास गायकवाड, वेदांत उदय कुलकर्णी व प्रथमेश संतोष आघाव यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. यावेळी मुख्याध्यापक संतोष आघाव, सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अमोल पुरंदरे, पालक राजेश स्वामी, कैलास गायकवाड, शिक्षिका श्यामा तांबारे, पूजा गिरी, निशिकांत कुलकर्णी, प्रमोद बाकलीकर, विलास पवार, परमेश्वर धुमाळे, सुरेखा गवळी, पधमाक्षा मडके, संतोष बन, अनिरुद्ध उनवणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष कुलकर्णी यांनी केले.