महामानवास जिल्हाभरात अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:30 IST2021-04-15T04:30:57+5:302021-04-15T04:30:57+5:30
(फोटो : ओबीडी न्यूज, ओबीडी काँग्रेस) उस्मानाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त जिल्हाभरात बुधवारी अभिवादन ...

महामानवास जिल्हाभरात अभिवादन
(फोटो : ओबीडी न्यूज, ओबीडी काँग्रेस)
उस्मानाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त जिल्हाभरात बुधवारी अभिवादन करण्यात आले. शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था, संघटनांच्या वतीने बाबासाहेबांचा पुतळा तसेच प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. काही ठिकाणी संविधानाच्या प्रती तसेच मठाईचे वाटप देखील करण्यात आले. शाळा, महाविद्यालयात ऑनलाईन कार्यक्रम पार पडले. यात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते.
उस्मानाबाद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती. येथील मध्यवर्ती जयंती समारोह समितीच्या वतीने देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार कैलास पाटील, पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांच्यासह समितीचे विद्यानंद बनसोडे, मोहन बनसोडे, प्रवीण बनसोडे, रोहित लगाडे, किशोर बनसोडे, अमित सोनवणे, बाबासाहेब बनसोडे व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी समितीच्या वतीने नागरिकांना मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी भीमनगर व परिसरातील उपासक व उपसिका मोठ्या संख्येने प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विश्वभूषण बनसोडे, बुध्दभूषण बनसोडे, राकेश गायकवाड, प्रेम ओव्हाळ, शरद कांबळे, सुशीलकुमार बनसोडे, बाळू जानराव, शरद वाघमारे, अभिषेक पांडागळे, आनंद बनसोडे, आदित्य बनसोडे यांनी परिश्रम घेतले.
अल्पोपहार वाटप
उस्मानाबाद : येथे काँग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अल्पोपहार वाटप करण्यात आला. तसेच जिल्हा कार्यालयात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे संघटक राजाभाऊ शेरखाने, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, मध्यवर्ती शिवजयंतीचे अध्यक्ष आशिष मोदानी, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सय्यद खलील, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, देवानंद येडके, जिल्हा सरचिटणीस हरिभाऊ शेळके, अब्दुल लतीफ, धनंजय राऊत, संजय गजधने, सुरेंद्र पाटील, सतीश इंगळगी, समाधान घटशिळे, प्रेम सपकाळ, प्रसन्न कुथले, मच्छिंद्र चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.