ढोकी येथे विविध ठिकाणी महामानवास अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:32 IST2021-04-16T04:32:32+5:302021-04-16T04:32:32+5:30
येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच नानासाहेब चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच अमोल समुद्रे, ...

ढोकी येथे विविध ठिकाणी महामानवास अभिवादन
येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच नानासाहेब चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपसरपंच अमोल समुद्रे, आंबेडकर साखर कारखान्याचे संचालक अयुब पठाण, ग्रामपंचायत सदस्य अ. बारी काझी, शकील काझी, निहाल काझी, समाज कल्याणचे माजी सभापती दगडू धावारे, मुजीब पठाण, महादू गरड, प्रमोद देशमुख, दादासाहेब औटे, मच्छिंद्र रसाळ आदी उपस्थित होते.
जयभवानी नगर येथील श्रावस्ती बुद्ध विहारात ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गावचे पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण व प्रतिमेस पुष्पहार करण्यात आले. सूत्रसंचालन के. डी. साळुंके यांनी केले. जयंती निमित्ताने पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी उपसरपंच आप्पासाहेब कांबळे, जीवन ढवारे, सौरभ होळकर, खंडेराया साळुंके आदी भीमसैनिक उपस्थित होते.
समतानगर भागात जिल्हा परिषद समाज कल्याणचे माजी सभापती दगडू धावारे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राहुल पोरे, शहाजी कांबळे, शाम ढवारे, बालाजी ढवारे, अविनाश गायकवाड, आतेफ काझी, सतीश कांबळे आदी उपस्थित होते. येथील पेट्रोलपंप चौकात पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी नायब तहसीलदार पंढरी औटे, माजी उपसरपंच आप्पासाहेब कांबळे, संतोष कंदले, विलास रसाळ, शहाजी कांबळे, राजू रसाळ, सतीश ढवारे, बबलू ढवारे, सौरभ होळकर, अक्षय औटे, खंडेराया साळुके, बाबासाहेब ढवारे, प्रीतम ढवारे, सुदर्शन ढवारे, महादेव ढवारे, रत्नदीप ढवारे, किशोर ढवारे, अमर ढवारे, जगन्नाथ ढवारे, तुकाराम ढवारे, मच्छिंद्र रसाळ, चंद्रकांत ढवारे आदी उपस्थित होते.
येथील साठेनगर मधील समाज मंदिरात बाजार समितीचे माजी सभापती निहाल काझी यांच्या हस्ते प्रतिमेस प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राजू कसबे, प्रमोद देशमुख, गुणवंत सुतार, रजनीकांत ढवारे, विलास रसाळ, राजू रसाळ, जगन्नाथ ढवारे, बाबा ढवारे आदी उपस्थित होते.