कांशीरामजी यांना उस्मानाबादेत अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:32 IST2021-03-16T04:32:12+5:302021-03-16T04:32:12+5:30

उस्मानाबाद : येथील जागृती फाऊंडेशन व संविधान न्याय-अधिकार संवर्धन संघर्ष समितीच्या वतीने बहुजन नायक, बसपाचे संस्थापक कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त ...

Greetings to Kanshi Ramji in Osmanabad | कांशीरामजी यांना उस्मानाबादेत अभिवादन

कांशीरामजी यांना उस्मानाबादेत अभिवादन

उस्मानाबाद : येथील जागृती फाऊंडेशन व संविधान न्याय-अधिकार संवर्धन संघर्ष समितीच्या वतीने बहुजन नायक, बसपाचे संस्थापक कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अभिवादन करण्यात आले. यावेळी कांशीरामजी यांच्या प्रतिमेला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, संघर्ष समितीचे ॲड. प्रबुद्ध कांबळे, रणजित गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी समितीचे सोमनाथ गायकवाड, मुकेश मोठे, ॲड. वाघमारे, आदिनाथ सरवदे, हिंमत शिंगाडे, जगन्नाथ बनसोडे, किरण कांबळे, कामगार नेते महादेव एडके, पेंटर युनियनचे बाबासाहेब कांबळे, सचिन बनसोडे, आप्पासाहेब सिरसाठे, सोहन बनसोडे, अतुल लष्करे, राजू कदम, अमोल वाघमारे, लहू खुने, अरुण देढे, श्रीकांत मटकीवाला, सुभाष सरवदे आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Kanshi Ramji in Osmanabad