शुक्रवारी सकाळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश गवळी, छावा क्रांतिवीर सेनेचे विभागीय अध्यक्ष जीवनराजे इंगळे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषाच्या घोषणा दिल्या. यावेळी कुमार टोले, धैर्यशील कापसे, अण्णासाहेब क्षीरसागर, दत्ता सोमाजी, प्रशांत अपराध, बाळासाहेब पाटील, मंगेश घाडगे औदुंबर जमदाडे प्रशांत इंगळे, महेश सिरसट, शंभूराजे इंगळे, राजाभाऊ घाडगे आदी उपस्थित हाेते. शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीनेही धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सकाळी महंत मावजीनाथ महाराज यांच्या हस्ते संभाजी महाराज यांच्या मूर्तीस दुग्धभिषेक घालून पूजा केली. यावेळी सुदर्शन वाघमारे, परीक्षित साळुंके, प्रतीक परमेश्वर, योगी खुंटाफळे, राजू भोरे, शंतनू नरवडे, गणेश धनके, शिवराज जाधव, अभिषेक पवार, राहुल शिंदे, ओंकार पवार, दादा बचाटे आदी उपस्थित हाेते.
छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:31 IST