भय्याराव भातलवंडे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:29 IST2021-01-21T04:29:46+5:302021-01-21T04:29:46+5:30
परंडा : समता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कै. भय्याराव गहिनीनाथ भातलवंडे यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध शाळांमध्ये अभिवादन करण्यात ...

भय्याराव भातलवंडे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
परंडा : समता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कै. भय्याराव गहिनीनाथ भातलवंडे यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध शाळांमध्ये अभिवादन करण्यात आले. पुण्यतिथीचा मुख्य कार्यक्रम आसू येथील चांदणी विद्यालयात पार पडला.
समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा ध्यास घेऊन कै. भातलवंडे यांनी माध्यमिक विद्यालय, प्राथमिक शाळा, इंग्रजी माध्यम शाळा उभ्या केल्या आहेत. यासाठी सर्वत्र सुसज्ज इमारती, मैदाने, शालेय साहित्य उपलब्ध आहे. भातलवंडे यांचे तालुक्याच्या शैक्षणिक विकासात मोठे योगदान आहे. यावेळी संस्थाध्यक्ष मारुती सोलनकर, मोहनराव पााटील, संस्था सचिव विमल भातलवंडे, बापू यादव, डाॅ. विजयसिंह भातलवंडे, डाॅ. स्वाती भातलवंडे, उमाकांत बुटे, वैभव शेळके, संपतराव जाधव, मंगलाताई बोराडे, आशा दिवाणे, दादाराव होरे, आस्तम चंदनशिवे यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
कै. भातलवंडे गुरुजी यांना कल्याणराव भातलवंडे विद्यालय (कपिलापुरी), चांदणी कनिष्ठ महाविद्यालय (आसू), समता विद्यालय (सापनाई, ता. कळंब), डाॅ. चंद्रहास पाटोदेकर प्राथमिक विद्यामंदिर (उस्मानाबाद), डीटीएड् काॅलेज (परंडा), लाॅर्ड कृष्णा इंग्लिश स्कूल (परंडा) येथेही अभिवादन करण्यात आले. (वाणिज्य वार्ता)