‘बीडीओं’च्या विराेधात आता ग्रामसेवक युनियन एकवटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST2021-06-18T04:23:39+5:302021-06-18T04:23:39+5:30
लोहारा : लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून सात महिन्यांपूर्वी रुजू झालेले सोपान अकेले हे मनमानी कारभार करीत लोकप्रतिनिधींना ...

‘बीडीओं’च्या विराेधात आता ग्रामसेवक युनियन एकवटली
लोहारा : लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून सात महिन्यांपूर्वी रुजू झालेले सोपान अकेले हे मनमानी कारभार करीत लोकप्रतिनिधींना सन्मानजनक वागणूक देत नसल्याचा आराेप २३ सरपंचांनी बुधवारी केला हाेता. असे असतानाच गुरुवारी ग्रामसेवक युनियन ‘बीडीओं’ यांच्या विराेधात एकवटली आहे. त्यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे धावत घेत त्यांच्या बदलीची मागणी केली.
लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले हे तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य पंचायत समितीत आल्यानंतर सन्मानाची वागणूक देत नाहीत. वृक्ष लागवड तसेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत सुरू असलेल्या कामासाठी जाणूनबुजून अडवणूक करतात. पंधराव्या वित्त आयोगाचे डीएसी काढण्यासाठी वारंवार टाळाटाळ करतात. त्यामुळे गावपातळीवरील विकास कामे खाेळंबतात. त्यामुळे बीडीओ अकेले यांच्या कारभाराची चाैकशी करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी तालुक्यातील जवळपास २३ ग्रामपंचायत सरपंचांनी केली हाेती. ही घडामाेड ताजी असतानाच गुरूवारी ग्रामसेवक युनियनही ‘बीडीओं’च्या विराेधात एकवटली आहे. बीडीओ सोपान अकेले हे मनमानी कारभार करीत आहेत. ग्रामसेवकांचा मूळ सज्जा बदलणे, मानसिक व आर्थिक त्रास देणे, वारंवार फोन करून धमकी देतात. यामुळे ग्रामसेवकांना मानसिक त्रास हाेत आहे. त्यामुळे त्यांची तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी युनियनच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष एम.टी.जगताप, जिल्हा सरचिटणीस सुदर्शन घोगरे, लोहारा तालुकाध्यक्ष एच.एम.चौधरी, सचिव एफ.आय.सय्यद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
काेट...
लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले हे ग्रामसेवकांना मानसिक त्रास देतात. तसेच असभ्य भाषा वापरता. यामुळे त्यांच्या बदलीची मागणी केली आहे. यांची बदली न झाल्यास लोहारा तालुक्यातील ग्रामसेवक २५ जूनपासून सामूहिक रजेवर जाणार आहेत.
-एम.टी. जगताप, जिल्हाध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन.