ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे पूल दुरुस्तीसाठी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:29 IST2021-01-22T04:29:24+5:302021-01-22T04:29:24+5:30
तालुक्यातील नागराळ (लो) ते लोहारा रोडवरील पूल जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालय उमरगाअंतर्गत गेल्या ३० ते ३५ उभारण्यात आला. ...

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे पूल दुरुस्तीसाठी उपोषण
तालुक्यातील नागराळ (लो) ते लोहारा रोडवरील पूल जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालय उमरगाअंतर्गत गेल्या ३० ते ३५ उभारण्यात आला. मात्र, त्यानंतर या पुलाच्या देखभाल व दुरूस्तीकडे संबंधित कार्यालयाचे दुर्लक्ष झाले. यामुळे सद्यस्थितीत या पुुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे पडले असून, पुलाचा काही भाग १३ ऑक्टोबर २०२० च्या मुसळधार पावसात ढासळला आहे. तसेच हा पूल अरुंद असून सतत रहदारी असल्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. याबाबत संबंधित कार्यालयाकडे एक, दोन वेळेस निवेदने दिली. मात्र, कुठलीच कार्यवाही झाली नसल्याचा आरोप उपोषणार्थिंनी केला आहे.
उपोषणात सरपंच रितू कुलदीप गोरे, उपसरपंच गुंडू जाधव, किसनराव पाटील, पिंटू गोरे, बळीराम गोरे, रणजित चिचोले, राजू गोरे, अभिमान गोरे, कुलदीप गोरे, वाल्मीक गोरे आदींचा सहभाग आहे.